Surya Gochar 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक अंतराने एका राशीतून दुसऱ्या राशीत विराजमान होतो. ग्रहांचा राजा सूर्यसुद्धा (Sun) एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करण्यासाठी तब्बल 30 दिवसांचा काळ लागतो. त्यानुसार, 16 ऑगस्ट रोजी आपल्या स्वराशीत म्हणजेच सिंह राशीत संक्रमण करणार आहे. तर, सिंह राशीत आधीपासूनच धन-संपत्तीचा दाता शुक्र (Venus) ग्रह विराजमान आहे. सूर्याने सिंह राशीत प्रवेश करताच शुक्रासह त्याती युती होणार आहे यामुळे शुक्रादित्य योगाची निर्मिती होणार आहे. याचा 4 राशीच्या लोकांना विशेष लाभ होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. 


ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्रादित्य योग फार शुभकारक मानण्यात आला आहे. हा योग निर्माण झाल्यामुळे अनेक राशींना (Zodiac Signs) चांगला धनलाभ होणार आहे. 


सिंह रास (Leo Horoscope)


सूर्य आणि शुक्र ग्रहाचं एकाच राशीत संक्रमण झाल्यामुळे शुक्रादित्य राजयोगाची निर्मिती होणार आहे. त्यामुळे सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ फार चांगला असणार आहे. या दरम्यान तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमच्या विवाहात येणारी संकटं दूर होतील. तसेच, नवीन नोकरीच्या संधी तुमच्यासाठी उपलब्ध होऊ शकतात. जोडीदाराबरोबरचे संबंध चांगले असतील. 


वृषभ रास (Taurus Horoscope)


शुक्र आणि सूर्य ग्रहाच्या युतीने वृषभ राशीच्या लोकांचा हा काळ फार शुभकारक असणार आहे. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात चांगलं यश मिळेल. तसेच, विद्यार्थ्यांना चांगला लाभ मिळेल. धनसंपत्ती मिळवण्याचे आणखी नवे स्त्रोत तुमच्यासाठी खुले होतील. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. पदोन्नती देखील होण्याची शक्यता आहे. तुम्हाला चांगलं यश मिळेल. 


वृश्चिक रास (Scorpio Horoscope)


शुक्रादित्य राजयोग निर्माण होणार असल्यामुळे या राशीच्या लोकांचा हा काळ फार लाभदायक असणार आहे. तुम्ही हाती घेतलेल्या कामात तुम्हाला चांगलं यश मिळेल. तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या मनातील इच्छादेखील पूर्ण होतील. व्यवसायिकांना कामाच्या ठिकाणी नवीन ऑर्डर्स मिळतील. त्यामुळे तुमचं मन खूप प्रसन्न होईल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Shani Pradosh Vrat 2024 : श्रावण महिन्यातील शेवटचं शनी प्रदोष व्रत नेमकं कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा, विधी आणि तिथी