Shani Pradosh Vrat 2024 : भगवान शंकराला (Lord Shiva) श्रावण महिना अतिशय प्रिय आहे. श्रावणात (Shravan) अनेक व्रत-वैकल्य आणि सण-समारंभ साजरे केले जातात. या महिन्यात भगवा शंकर आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते. तसेच, श्रावणात येणारा प्रदोष व्रतही फार महत्त्वाचा आहे. मान्यतेनुसार, जे भक्त हे व्रत ठेवतात त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. त्यामुळे यंदाचा श्रावणाचा अंतिम प्रदोष व्रत नेमका कधी आहे? तसेच हे व्रत कसं ठेवलं जाणार आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
शनि प्रदोष व्रत कधी?
पंचांगानुसार, श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी 17 ऑगस्ट रोजी असणार आहे. त्यानुसार, आज शनी प्रदोष व्रत ठेवलं जाणार आहे. शनी प्रदोषची सुरुवात सकाळी 8 वाजून 05 मिनिटांनी होणार आहे तर 18 ऑगस्ट रोजी सकाळी 05 वाजून 51 मिनिटांनी या व्रताची समाप्ती होणार आहे.
या तिथीनुसार प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शंकराची विधीवत पूजा केली जाते. या प्रदोष व्रताची वेळ संध्याकाळी 6 वाजून 58 मिनिटांपासून सुरु होऊन ते रात्री 9 वाजून 11 मिनिटांनी होणार आहे. तसेच, या काळात भगवान शंकराची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं.
शनी प्रदोष व्रताची शुभ वेळ 2024 (Shani Pradosh Vrat Shubh Muhurta 2024)
ज्योतिष शास्त्रानुसार, श्रावण महिन्यातील अंतिम प्रदोष व्रताच्या दिवशी या वेळी प्रीती योग जुळून येणार आहे. या शुभ योगाची समाप्ती सकाळी 10 वाजून 48 मिनिटांनी होणार आहे. यानंतर, आयुष्मान योग जुळून येणार आहे. हा योग रात्रीपर्यंत असणार आहे. तसेच, या तिथीच्या दिवशी दुर्लभ असा शिवास योगसुद्धा जुळून येणार आहे. असं म्हणतात की, या शुभ समयी भगवान शंकर सकाळी 08.05 मिनिटांपर्यंत कैलाश पर्वतावरच निवास करणार आहेत. तसेच, नंदीवर स्वार करणार आहेत.
शनी प्रदोष व्रताचा शुभ मुहूर्त 2024 (Shani Pradosh Vrat Shubh Muhurta 2024)
सूर्योदय - 06 वाजून 04 मिनिटांनी
सूर्यास्त - 06 वाजून 58 मिनिटांनी
चंद्रोदय - 05 वाजून 18 मिनिटांनी
चंद्रास्त - 18 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 4 वाजून 10 मिनिटांनी
ब्रम्ह मुहूर्त - सकाळी 4.35 पासून ते 5.20 पर्यंत
विजय मुहूर्त - दुपारी 02.40 ते 3.31 पर्यंत
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: