Shravan Recipe : श्रावण महिन्याला हिंदू धर्मात अत्यंत महत्त्व आहे. श्रावण महिना हा व्रत वैकल्याचा आहे, या महिन्यात अनेकजण मांसाहार करत नाहीत, सात्त्विक आहाराचे सेवन करतात. जर तुम्हालाही श्रावण महिन्यात सात्विक जेवण आवडत असेल, मात्र काय बनवायचं? याचा विचार करण्यात तुम्हाला अडचण येत असेल. तर आज आम्ही तुम्हाला अशा काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत. जे लसूण आणि कांद्याशिवाय बनवता येतील, तसेच हे पदार्थ चवदार देखील असतात. जाणून घेऊया या खास पदार्थांबद्दल....
श्रावणात अनेकजण सात्विक अन्न खाणं पसंत करतात
श्रावण महिना सुरू झाला असून भाविक महिनाभर भगवान शंकराच्या भक्तीत तल्लीन राहणार आहेत. या काळात लोक श्रावणी सोमवार- शनिवारचा उपवास करतात आणि भगवान भोलेनाथची पूजा करतात. अनेकजण उपवास करण्याऐवजी सात्विक अन्न खाणे पसंत करतात. म्हणजेच लसूण आणि कांदा नसलेले अन्न खातात. अशात कांदा-लसूणाशिवाय काय शिजवायचे? असा प्रश्न अनेकवेळा पडतो. म्हणूनच, आज आम्ही तुम्हाला लसूण आणि कांद्याशिवाय बनवलेल्या काही रेसिपींबद्दल सांगत आहोत ज्या तुम्ही सहज बनवून खाऊ शकता, तर चला जाणून घेऊया या रेसिपींबद्दल...
बेसन करी
बेसनाची करी ही एक राजस्थानी डिश आहे, ज्यामध्ये बेसन मसालेदार ग्रेव्हीमध्ये शिजवले जाते. लसूण आणि कांदा नसतानाही तुम्ही टोमॅटो, धने-जिरे पावडर, हळद, तिखट आणि गरम मसाला घालू शकता. रोटी किंवा भातासोबत खाऊ शकतो.
दही भेंडी
दह्याची भेंडी खायला खूप चविष्ट असते. हे बनवण्यासाठी तुम्हाला लसूण आणि कांद्याची गरज भासणार नाही. यासाठी भेंडी तळून त्यात दही आणि मसाले घालून तयार केले जाते. तुम्ही चपाती किंवा भातासोबत खाऊ शकता.
बटाटा फ्लॉवर
बटाटा आणि फ्लॉवर सर्वांनाच आवडतो. एका मसालेदार ग्रेव्हीमध्ये बटाटे आणि फ्लॉवर शिजवले जातात. यासाठी लसूण आणि कांदा लागत नाही, तुम्ही धणे-जिरे पावडर, हळद, तिखट आणि गरम मसाला असे इतर मसाले घालून बनवू शकता.
दाल तडका
डाळीत फोडणी टाकून बनवलेला एक सोपा आणि स्वादिष्ट पदार्थ. लसूण आणि कांदा न टाकताही तुम्ही फोडणीच्या स्वरूपात हिंग, जिरे, मिरची आणि गरम मसाला घालून चपाती आणि भातासोबत खाऊ शकता.
शाही पनीर
ही एक लोकप्रिय पनीर डिश आहे, ज्यामध्ये पनीर क्रीमी ग्रेव्हीमध्ये शिजवले जाते. लसूण आणि कांदा न घालताही तुम्ही टोमॅटो, दही, मलई आणि नारळाचे दूध घालून मसालेदार ग्रेव्ही तयार करू शकता.
हेही वाचा>>>
Monsoon Recipe : खमंग....खुसखुशीत.. तुम्ही कधी 'ब्रेड समोसा' ट्राय केलाय? ब्रेकफास्ट ते संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी झटपट अन् टेस्टी रेसिपी
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )