Maharashtra Rain News : हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील काही भागातच पाऊस पडत आहे. बहुतांश जिल्ह्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहिले आहेत. तर धरणांच्या पाणीसाठ्यात (Dam Water) देखील वाढ झालीय. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आज राज्याच्या काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा (Heavy Rain) इशारा देण्यात आला आहे. जाणून घेऊयात आजचा हवामानाचा अंदाज.


या जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील सहा जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये कोकणातील रायगड, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे तर विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. या सहा जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं या जिल्ह्यातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. 



तळकोकणातील काही भागात पावसाचा जोर कायम



तळकोकणातील काही भागात पावसाचा जोर कायम असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे.

कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, वैभववाडीत पावसाचा जोर कायम आहे. समुद्र खवळलेल्या स्थितीत असल्याने मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असे आवाहन मच्छ विभागानं केलं आहे. 


पुढील तीन-चार दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज


पुढील तीन-चार दिवस राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. पुणे (Pune Rain) व रायगडसह घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. कोकणातील पालघर, रायगड, जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा (Heavy Rain) अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच धुळे, जळगाव, नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह तुरळक ठिकाणी पावसाची (Heavy Rain) शक्यता आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यताया पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासानाच्या वतीनं करण्यात आलं आहे. 



महत्वाच्या बातम्या:


Jayakwadi Dam : मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी! नाशिक जिल्ह्यातून जायकवाडीला आतापर्यंत 10 टीएमसी पाणी रवाना, पाणीचिंता मिटणार