Astrology : सूर्य, चंद्र आणि गुरु ग्रहांचा संयोग: 'या' राशींना 2025 मध्ये बंपर लाभ! नशिबाचे दरवाजे उघडणार?
Sun Moon And Jupiter Conjunction : येत्या 27 जून 2025 रोजी म्हणजेच उद्या ग्रहांचा राजा सूर्य, चंद्र आणि गुरु ग्रह बृहस्पती यांचा संयोग जुळून येणार आहे.

Sun Moon And Jupiter Conjunction : ज्योतिष शास्त्रात सूर्यदेवाला (Sun) मान-सन्मान, प्रतिष्ठा आणि आत्मविश्वासाचा कारक ग्रह मानण्यात आलं आहे. तर, गुरु ग्रहाला ज्ञान, बुद्धी, पैसा आणि सुख-शांतीचा कारक ग्रह म्हणतात. चंद्र ग्रह हा मनाचा कारक ग्रह मानला जातो. त्यामुळे येत्या 27 जून 2025 रोजी म्हणजेच उद्या ग्रहांचा राजा सूर्य, चंद्र आणि गुरु ग्रह बृहस्पती यांचा संयोग जुळून येणार आहे. याचा प्रभाव सर्व राशींवर होणार आहे. मात्र, तीन राशींना चांगला लाभ मिळेल. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी सूर्य, चंद्र आणि बृहस्पतीचा संयोग फार सकारात्मक ठरणार आहे. या काळात तुमची संवादकौशल्य शैली दिसून येईल. तसेच, तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. या काळात उत्पन्नाचे नवे स्त्रोत तुमच्यासाठी निर्माण होतील. मानसिक धैर्य वाढेल. तसेच, समाजात तुम्हाला मान-सन्मान मिळेल.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीसाठी सूर्य, चंद्र आणि गुरु ग्रहाचा शुभ संयोग फार लाभदायक ठरणार आहे. या संयोगामुळे तुमच्या करिअरमध्ये प्रगतीचे अनेक मार्ग मोकळे होतील. व्यवसायात वाढ झालेली दिसेल. तसेच, नोकरीच्या अनेक संधी तुमच्यासाठी उपलब्ध होतील. व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी चांगला असणार आहे. पैसे गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल.
सिंह रास (Leo Horoscope)
चंद्र, सूर्य आणि गुरु ग्रह बृहस्पतीच्या संयोगाने सिंह राशीसाठी हा काळ फार अनुकूल ठरणार आहे. या काळात तुमची आर्थिक स्थितीदेखील चांगली असेल. तसेच, उत्पन्नाच्या अनेक नवीन संधी तुमच्यासमोर निर्माण होतील. तुमचे रखडलेले पैसे देखील तुम्हाला या काळात मिळू शकतात. एकूणच हा काळ तुमच्यासाठी चांगला असणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :



















