Shukra Parivartan 2024: 2024 वर्ष संपायला अवघे काही दिवस बाकी आहेत. पण हे वर्ष जाता जाता काही राशींच्या लोकांना बरंच काही देऊन जाणार आहे. कारण नवीन वर्ष येण्याआधीच 3 राशींचे नशीब चमकणार आहे. 2024 वर्षाच्या शेवटी होत असलेल्या काही ग्रहांच्या संक्रमणामुळे 3 राशीच्या लोकांना नवीन वर्ष येण्याआधीच बंपर लाभ मिळण्याची शक्यता ज्योतिषशास्त्रानुसार वर्तविण्यात येतेय. जाणून घेऊया या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत?


आज रात्री 11 वाजता शुभ योग बनणार! 3 राशींचे नशीब चमकणार..


ज्योतिषशास्त्रानुसार, धनाचा ज्याच्याशी संबंध आहे असा शुक्र आज शनिच्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे, कुंभ ही न्यायाची देवता शनिची राशी आहे. आज शुक्राच्या या राशीतील संक्रमणाने 3 राशींचे भाग्य सुधारणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हे शुभ योग शनि त्रयोदशीच्या दिवशी बनत आहेत, जे ज्योतिषशास्त्रात अतिशय शुभ मानले जातात. नवीन वर्ष येण्याआधीच या 3 राशींचे नशीब चमकेल. त्यांना नोकरीपासून व्यवसायापर्यंत सर्वत्र उत्कृष्ट लाभ मिळतील. अचानक धनलाभ होण्याचीही शुभ शक्यता आहे. हे येणारे काही दिवस तुमच्यासाठी चांगले असणार आहेत. तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त लाभ मिळू शकतात. या लोकांसाठी येणारा काळ संपत्ती, सौभाग्य, प्रेम आणि आर्थिक बाबतीत अत्यंत फायदेशीर असेल. हिंदू कॅलेंडरनुसार, हे संक्रमण आज रात्री 11.28 वाजता होईल. 


मेष - सर्वात मोठी इच्छा पूर्ण होणार?


ज्योतिषांच्या गणनेवर आधारित, शुक्र ग्रह मेष राशीच्या लोकांच्या कुंडलीत अकराव्या स्थानात प्रवेश करेल. हे संक्रमण होताच, तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. उत्पन्न नक्कीच वाढेल आणि येत्या नवीन वर्षात तुमच्या व्यवसायात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. समाजात मान-सन्मान वाढेल आणि लव्ह लाईफही सुधारेल. या कालावधीत तुम्ही कोणत्याही मालमत्तेमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला आगामी काळात प्रचंड फायदे दिसतील.


मिथुन - नशिबाचा उदय होणार?


मिथुन राशीच्या लोकांच्या कुंडलीत नवव्या घरात शुक्राचे भ्रमण होईल. नववे घर नशिबाचे घर आहे, म्हणजेच शुक्राच्या संक्रमणादरम्यान मिथुन राशीच्या लोकांसाठी नशिबाचा उदय होईल. नोकरीत अचानक बढती मिळण्याची शक्यता आहे. परदेश दौऱ्यावर जाऊ शकता. तुम्ही अविवाहित असाल तर तुम्हाला जीवनसाथी मिळू शकेल. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. आर्थिक स्थितीही पूर्वीपेक्षा अनेक पटींनी चांगली होईल.


मकर - बँक बॅलन्स झपाट्याने वाढणार?


मकर राशीच्या लोकांचा बँक बॅलन्स झपाट्याने वाढणार आहे. शुक्र तुम्हाला द्वितीय घरातून लाभदायक ठरेल. नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच तुमचे नशीब बदलू लागेल. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. अडकलेला पैसा परत येईल आणि कष्टकरी लोकांना त्यांच्या मेहनतीचे खरे फळ आता मिळू लागेल. तुम्हाला प्रमोशन मिळू शकते किंवा तुम्हाला नवीन नोकरी देखील मिळू शकते.


हेही वाचा>>>


Garud Puran: 'महिलांवर वाईट नजर टाकाल तर याद राखा...तुमचाही हिशोब होतोय!' महिलांवरील विविध अत्याचारासाठी गरुडपुराणात 'या' भयानक शिक्षा


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )