Garud Puran: आजकाल आपण महिला अत्याचाराशी संबंधित अशा अनेक बातम्या ऐकतो, वाचतो.. ज्यामुळे आपल्या अंगावर काटा येतो. अशा या वाढत्या घटनांमुळे महिलांचं घराबाहेर निघणं मुश्कील होऊन बसतं. महिलांवर अत्याचार करणारे नराधम कदाचित कायद्याच्या कचाट्यातून वाचतीलही...पण गरुडपुराणानुसार मोठं पाप करणाऱ्यांच्या श्रेणीत त्याच्या नावाची नोंद आधीच करण्यात आलीय. गरुड पुराणात महिलांवरील अत्याचार आणि गुन्हे करणाऱ्यांसाठी अतिशय धोकादायक शिक्षा सांगण्यात आल्या आहेत. जे पुरुष स्त्रियांवर लैंगिक अत्याचार करतात किंवा त्यांच्याकडे वाईट नजरेने पाहतात त्यांना त्यांच्या वाईट कृत्यांबद्दल नरकात गेल्यावर सर्व प्रकारच्या यातना सहन कराव्या लागतात. जाणून घ्या...
महिलांवरील अत्याचार आणि गुन्हे करणाऱ्यांसाठी अतिशय धोकादायक शिक्षा
गरुडपुराणानुसार, यमराजाचे दूत पापी लोकांच्या आत्म्यांना त्यांच्या मृत्यूनंतर यमराजाच्या दरबारात कसे आणतात याचे वर्णन पुराणात आहे. याशिवाय यमराज मानवांना त्यांच्या कर्मानुसार कोणती शिक्षा देतात हे देखील सांगितले आहे. आज आम्ही तुम्हाला महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना नरकात कोणत्या शिक्षा भोगाव्या लागतात ते सांगत आहोत. जे महिलांचे लैंगिक शोषण करतात, त्यांना मारहाण करतात, या गुन्ह्यासाठी यमराजाचे दूत आरोपींना काय शिक्षा देतात?शिक्षा पूर्ण करून पुढील जन्म कोणाचा मिळतो. हेही गरुड पुराणात सांगितले आहे.
परस्त्रीकडे पाहणाऱ्या पुरुषाला 'ही' कठोर शिक्षा
गरुड पुराणात सांगितले आहे की, जे लोक स्त्रियांवर अत्याचार करतात, ते मृत्यूनंतर नरकात पोहोचतात तेव्हा यमदूत त्यांना उकळत्या तेलात टाकतात. अशा लोकांवर यमदूत गरम वितळलेले लोखंड ओततात. याविषयी सविस्तर जाणून घेऊया आणि महिलांविरुद्धचे गुन्हे करणाऱ्यांना काय शिक्षा भोगावी लागते? ते समजून घेऊया..जे पुरुष इतर स्त्रियांकडे पाहतात किंवा त्यांचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या आत्म्यांना नरकात जावे लागते आणि लोखंडी खांबाला आलिंगन द्यावे लागते. मग ज्या आत्म्याने घोर पाप केले. या शिक्षेमुळे आत्म्याचे संपूर्ण शरीर जळून जाते आणि पुढच्या जन्मी त्याला कोल्हा किंवा लांडग्याचा जन्म घ्यावा लागतो.
कुमारीका किंवा अल्पवयीन मुलीशी लैंगिक संबंध ठेवणाऱ्या पुरुषांना शिक्षा
गरुडपुराणानुसार जे चारित्र्यहीन पुरुष कुमारिका किंवा तरुणीशी शारीरिक संबंध ठेवण्याचे अपवित्र कृत्य करतात, त्यांना पुढील जन्मी अजगराची योनी मिळते. नरकात जाताना यमदूम त्यांना यमराजांसमोर हजर करतो. मग अशा पाप्यांना यमराज कठोरात कठोर शिक्षा देतात. नरकात गेल्यावर यमदूत अशा आत्म्यांना उकळत्या तेलात टाकतात, तळून घेतात आणि शारीरिक छळ करतात, असे गरुड पुराणात सांगितले आहे.
स्त्री भ्रूणहत्या करणाऱ्यांना ही शिक्षा
गरुड पुराणात अशा पापी लोकांसाठी शिक्षा सांगितली आहे जे स्त्रियांना गर्भधारणा करून गर्भातच मुलींना मारण्याचे पाप करतात. अशा लोकांना भ्रूणहत्येचे दोषी मानले जाते. असे पुरुष पुढच्या जन्मी नपुंसक होतात. नरकात यमदूत अशा पापी माणसांना जंगली प्राण्यांप्रमाणे वागवतात आणि त्यांना कठोर शिक्षा देतात, जेणेकरून पुढच्या जन्मी असे पाप करण्याची त्यांची हिंमत होऊ नये.
मित्राच्या पत्नीशी संबंध ठेवणाऱ्यांना ही शिक्षा
गरुडपुराणानुसार, आपल्या मित्राचा विश्वासघात करून आपल्या पत्नीशी संबंध ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा पुरुषांना यमराज नरकात अत्यंत धोकादायक शिक्षा देतात. असे लोक अनेक वर्षे नरक यातना सहन करून गाढवाच्या योनीत जन्म घेतात आणि त्यांना पुन्हा पृथ्वीवर पाठवले जाते.
गुरूच्या पत्नीवर वाईट नजर टाकणाऱ्याला ही शिक्षा मिळते
गरुडपुराणानुसार, असे चारित्र्यहीन पुरुष जे आपल्या मातेसमान गुरूच्या पत्नीवर वाईट नजर टाकतात त्यांचे यमराज पुढील जन्मी सरड्याच्या जन्मात रूपांतरित करतात. जे वासनेने पीडित होऊन गुरूच्या पत्नीच्या सन्मानाचा अपमान करतात, त्यांना नरकात नग्न करून लोखंडी सळ्यांनी जाळले जाते. अनैसर्गिक कृत्य करणाऱ्यांना नरकात जाऊन डुक्कर व्हावे लागते. अनेक वर्षे यमदूताने दिलेल्या यातना सहन केल्यानंतर त्याला बैलाची योनी मिळते.
हेही वाचा>>>
Garud Puran: हिंदू धर्मात महिला स्मशानभूमीत का जात नाहीत? अनेकांना माहित नाही त्यामागचे कारण, गरुड पुराणात काय म्हटलंय?
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )