Shadashtak Yog 2024 : 14 नोव्हेंबरपासून पालटणार 3 राशींचं नशीब; शुक्र आणि मंगळाची युती, अनपेक्षित मार्गातून येणार चिक्कार पैसा
Shadashtak Yog 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र आणि मंगळ मिळून लवकरच षडाष्टक योग तयार करणार आहेत. हा योग 3 राशींसाठी भाग्याचा ठरणार आहे. या राशींना अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो.
Shadashtak Yog 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार, नऊ ग्रह आपापल्या ठरलेल्या काळात आपली स्थिती बदलतात. ग्रहांच्या स्थितीतील या बदलामुळे रोज शुभ आणि अशुभ योग तयार होतात. यानुसार लवकरच शुक्र आणि मंगळ मिळून षडाष्टक योग तयार करणार आहेत. अशा स्थितीत काही राशीच्या लोकांना बंपर लाभ मिळू शकतो. शुक्र आणि मंगळामुळे तयार झालेला षडाष्टक योग (Shadashtak Yog) कोणत्या राशीसाठी फायदेशीर ठरू शकतो? जाणून घेऊया.
वैदिक पंचांगानुसार, 14 नोव्हेंबरला दुपारी 1:28 वाजता शुक्र मकर राशीत अंशबल 3 मध्ये असेल. अशा स्थितीत दोन ग्रहांमध्ये 46° 54′ 56″ अंतर आहे, त्यामुळे हा योग तयार होत आहे.
वृषभ रास (Taurus)
या राशीत मंगळ तिसऱ्या भावात आणि शुक्र आठव्या भावात असेल. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतं, तसेच भरपूर आर्थिक लाभही होऊ शकतो. करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला विशेष लाभ मिळू शकतो. तुमची क्षमता लक्षात घेता तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो. अशा परिस्थितीत तुम्हाला काही मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातही तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो. परदेशात बिझनेस करणाऱ्या लोकांनाही खूप फायदा होऊ शकतो. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. यासोबतच लव्ह लाईफही चांगली असणार आहे.
मकर रास (Capricorn)
मकर राशीच्या लोकांनाही मंगळ आणि शुक्राचा विशेष आशीर्वाद लाभू शकतो. या राशीच्या लोकांना मित्र आणि कुटुंबीयांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्ही त्यांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी होऊ शकता. करिअर क्षेत्रात तुम्हाला चांगलं यश मिळेल. तुम्हाला हे यश मिळवण्यात घरातील सर्वजण मदत करू शकतात. व्यवसायाच्या क्षेत्रातही तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. तुमची लव्ह लाईफ सुद्धा चांगली जाणार आहे.
कन्या रास (Virgo)
कन्या राशीच्या लोकांसाठी हा योग खूप फायद्याचा ठरणार आहे. तुमची प्रदीर्घ प्रलंबित कामं पुन्हा सुरळीत होऊ शकतात. वडिलोपार्जित संपत्तीतून तुम्हाला अचानक लाभ मिळू शकतो. तुम्ही दीर्घकाळापासून केलेले कष्ट आता तुम्हाला फळ मिळवून देतील. करिअरच्या क्षेत्रातही तुम्हाला बरेच फायदे होतील. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. नोकरीच्या अनेक नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. यासोबतच तुम्हाला कामाच्या संदर्भात प्रवास करावा लागू शकतो. व्यवसायाच्या क्षेत्रातही तुम्हाला मोठा नफा होऊ शकतो. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल आणि तुम्ही पैसे वाचवण्यात यशस्वी होऊ शकता. तुमचं आरोग्य चांगलं राहील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: