Shukra Gochar 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 24 ऑगस्ट रोजी रात्री 1 वाजून 14 मिनिटांनी शुक्र (Venus) ग्रह कन्या राशीत प्रवेश करणार आहे. तसेच, कन्या राशीचा स्वामी ग्रह बुध आहे तसेच शुक्र राशीचा मित्र ग्रह आहे. त्यामुळे शुक्र ग्रहाचे परिणाम अनुकूल असणार आहेत. तर, केतु ग्रह आधीपासूनच कन्या राशीत विराजमान आहे आणि शुक्र ग्रहासह मिळून महायोग निर्माण होणार आहे. 


ज्योतिष शास्त्रात, शुक्र ग्रहाला सौभाग्य, सुख-सुविधेचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे या दरम्यान कोणत्या राशींवर (Zodiac Signs) शुभ प्रभाव होणार आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 


वृश्चिक रास (Scorpio Horoscope)


ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्र ग्रह कन्या राशीत संक्रमण केल्याने वृश्चिक राशीच्या लोकांवर याचा चांगला प्रभाव पडणार आहे. या दरम्यान शुक्र ग्रहाच्या कृपेने तुमच्या व्यवसायाचा विस्तार होईल. या काळात तुमची अनेक थांबलेली कामे पूर्ण होतील. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमची ही इच्छा लवकरच पूर्ण होऊ शकते. अनेक दिवसांपासून रखडलेले तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील. धनलाभाचे संकेत आहेत. आरोग्य चांगलं राहील. 


मीन रास (Pisces Horoscope)


मीन राशीच्या लोकांना शुक्राच्या संक्रमणाचा चांगला लाभ होणार आहे. शुक्र ग्रह मीन राशीच्या जीवनात चांगला आनंद घेऊन येणार आहे. शुक्र ग्रहाला धन, सुख-संपत्तीचा कारक ग्रह मानला जातो. तसेच, या राशीच्या लोकांच्या रोजगारातही चांगली प्रगती दिसून येईल. मित्रांचं सहकार्य तुमच्यासाठी फार मोलाचं ठरणार आहे. तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा होईल. वडिलोत्पार्जित संपत्तीचा लाक्ष देखील तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. 


सिंह रास (Leo Horoscope)


ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्र ग्रहाच्या संक्रमणाने सिंह राशीच्या लोकांना चांगला लाभ होणार आहे. या काळात तुम्हाला चांगला धनलाभ होईल. शुक्र ग्रहाच्या प्रभावाने तुमच्या सुख-सुविधांमध्ये चांगली वाढ होईल. तुम्ही हाती घेतलेल्या कार्यात तुम्हाला यश मिळेल. कुटुंबात सुख-शांती नांदेल. आयुष्यात तुम्हाला अनेक क्षेत्रांत चांगले परिणाम मिळतील. मित्रांच्या सहकार्याने तुमची अनेक कामे अगदी सहजपणे पूर्ण होतील. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हे ही वाचा :


Shani Dev : 15 नोव्हेंबरला कुंभ राशीत होणार शनी मार्गी, 'या' 3 राशींच्या नशिबाला लागणार चार चॉंद, प्रगतीसह धनलाभाचेही योग