Shani Dev : ज्योतिषशास्त्रात, शनीला (Lord Shani) न्यायदेवता आणि कर्मफळदाता म्हणून ओळखलं जातं. सर्व ग्रहांच्या तुलनेत शनी (Shani Dev) सर्वात धिम्या गतीने चालणारा ग्रह आहे. शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी लागतो. शनी सध्या आपली मूळ रास म्हणजेच कुंभ राशीत विराजमान आहे. 2025 पर्यंत शनी याच राशीत विराजमान असणार आहे.
सध्या शनी कुंभ राशीत वक्री अवस्थेत विराजमान आहे. शनीची ही उलटी चाल अनेक राशीच्या लोकांसाठी लाभकारक ठरणार आहे. तर, काही राशीच्या लोकांना सांभाळून राहण्याची गरज आहे. त्याचबरोबर, दिवाळीनंतर म्हणजेच 19 नोव्हेंबर रोजी शनी मार्गी चालणार आहेत. शनीच्या सरळ चालीने सर्व 12 राशींच्या जीवनावर चांगला-वाईट परिणाम होणार आहे. या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
पंचांगानुसार, शनी 30 जून रोजी कुंभ राशीत वक्री चाल चालणार आहेत. तर, 15 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजून 51 मिनिटांनी मार्गी होणार आहेत. त्यामुळे 3 राशींच्या लोकांना शारीरिक, मानसिक आरोग्यासह आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
मिथुन रास (Gemini Horoscope)
या राशीच्या भाग्य भावात नवव्या चरणात शनी सरळ चाल चालणार आहेत. त्यामुळे तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळणार आहे. प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला नशिबाची साथ मिळून धनलाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबियांबरोबर तुमचा वेळ चांगला जाईल. तसेच, उच्च शिक्षणासाठी तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. धार्मिक कार्यात तुमची रुची वाढेल. तुमच्या जीवनात आनंद वाढेल.
मेष रास (Aries Horoscope)
शनी कुंभ राशीत मार्गी होणार असल्याने मेष राशीच्या लोकांना या काळात चांगला लाभ होणार आहे. या काळात तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ होईल. तसेच तुम्ही प्रत्येक कार्यात यश मिळवू शकता. त्याचबरोबर, उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. करिअरमध्ये यश तुम्हाला मिळू शकतं. त्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करण्याची गरज आहे. तसेच, अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या तुमच्या समस्या हळूहळू संपतील.
मकर रास (Capricorn Horoscope)
शनीच्या मार्गी होण्याने मकर राशीच्या लोकांसाठी फार लाभदायक असणार आहे. या काळात अनेक दिवसांपासून रखडलेली तुमची कामे पूर्ण होतील. तुमच्या सुख-सुविधेत चांगली वाढ होईल. तसेच, उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासमोर उभे राहतील. तसेच, तुमचं आरोग्य चांगलं राहील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :