Kalpataru IPO : रियल इस्टेट क्षेत्रातील दिग्गज कल्पतरु (Kalpataru) ही दिग्गज कंपनी लवकरच आपला आयपीओ घेऊन येणार आहे. ही कंपनी आयपीओच्या माध्यमातून 1600 कोटी रुपये उभे करणार आहे. या पैशांतून कंपनीला आपल्या रियल इस्टेट प्रोजेक्ट्सची गती वाढवायची आहे. कल्पतरूने आयपीओबाबतची कागदपत्रे भांडवली बाजार नियामक संस्था सेबीकडे सोपवली आहेत. या कंपीकडून मिड सेगमेंट, लक्झरी ते कमर्शियल अशा वेगवेगळ्या श्रेणीतील हाऊसिंग प्रोजेक्टसची निर्मिती करते. या कंपनीचे प्रोजेक्ट्स 41.95 दशलक्ष वर्ग फुटच्या परिसरात पसरलेले आहेत.
100 टक्के फ्रेश इश्यू, ऑफर फॉर सेल नसणार
कल्पतरुच्या ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) अनुसार हा आयपीओ साधारण 1590 कोटी रुपयांचा असणार आहे. आयपीओतून उभ्या राहिलेले पैसे कंपनी कर्जाची परतफेड आणि कॉर्पोरेट कामांसाठी वापरणार आहे. या आयपीओसाठी कंपनी ऑफर फॉर सेलचा पर्याय न निवडता 100 टक्के फ्रेश शेअर इश्यू करेल. या आयपीओसाठी प्रत्येक शेअरची फेस व्हॅल्यू 10 रुपये ठेवण्यात आली आहे.
ठाण्यात चौथ्या क्रमांकाची कंपनी
कल्पतरू हा रियल इस्टेट क्षेत्रातील मोठा ब्रँड आहे. ही कंपनी लक्झरी आणि प्रिमियम प्लॅट्ससाठी ओळखली जाते. या आर्थिक वर्षात कंपनीने अनेक नव्या प्रोजेक्ट्सवर काम चालू केले आहे. सध्या या कंपनीच्या हातात अनेक प्रोजेक्ट्स आहेत. भविष्यातही अनेक प्रकल्पांवर ही कंपनी काम करणार आहे. त्यामुळे रियल इस्टेट क्षेत्रात या कंपनीने आपले वेगळे स्थानि निर्माण केलेले आहे.
आयपीओ कधी येणार हे अस्पष्ट
कल्पतरू या कंपनीने आपल्या आयपीओसाठी जेएम फायनॅन्शियल (JM Financial), आयसीआयसीआय सिक्योरिटीज (ICICI Securities) आणि नोमुरा फायनॅन्शियल अॅडव्हायजरी अँड सिक्योरिटीज (Nomura) यांना रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्त केलं आहे. दरम्यान, हा आयपीओ नक्की कधी येणार हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र कल्पतरून कंपनीने सेबीकडे ड्राफ्ट दिल्यामुळे आगामी काळात लवकरच या कंपनीचा आयपीओ येणार असून त्या माध्यमातून चांगले पैसे कमवण्याची संधी गुंतवणूकदारांना असेल.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
तुमच्या खात्यात अजून 3000 रुपये आले नाहीत? आता काय करावं? 'या' तीन गोष्टी समजून घ्या
Gold Silver Rate : सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे ताजे दर काय?