Shatank Yog 2025 : अवघ्या 4 दिवसांनी सूर्य-शनिचा जुळून येतोय अद्भुत योग; 7 डिसेंबरपासून पदरात पडणार फक्त पुण्य; 'या' राशींची चांदीच चांदी
Shatank Yog 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, पिता-पुत्र असूनही सूर्य-शनि एकमेकांशी शत्रुत्व ठेवतात. 7 डिसेंबर रोजी शनि मीन राशीत विराजमान होणार आहे. यामुळे काही राशींना चांगलाच लाभ मिळणार आहे.

Shatank Yog 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, कर्मफळदाता शनिला सर्वात हळुवार गतीने चालणारा ग्रह मानतात. त्यामुळेच शनिचा प्रभाव जर एखाद्या राशीवर पडला तर तो दिर्घकाळापर्यंत राहतो. सध्या शनीने मीन राशीत मार्गी (Shani Margi) चाल केली आहे. आता शनी आणि सूर्य ग्रह मिळून शतांक योग बनवणार आहेत. येत्या 7 डिसेंबर रोजी सूर्य (Sun) आणि शनि एकमेकांच्या 100 डिग्री अंतरावर असतील. तेव्हाच हा योग जुळून येणार आहे. सूर्य-शनिचा शतांक योग कोणत्या राशींसाठी लाभदायी ठरेल हे जाणून घेऊयात.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, पिता-पुत्र असूनही सूर्य-शनि एकमेकांशी शत्रुत्व ठेवतात. 7 डिसेंबर रोजी शनि मीन राशीत विराजमान होणार आहे. यामुळे काही राशींना चांगलाच लाभ मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीसाठी सूर्य-शनिचा शतांक योग अनेक अर्थाने खास असणार आहे. या राशीच्या दुसऱ्या चरणात शनि आणि दहाव्या चरणात सूर्य विराजमान आहे. त्यामुळे तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. करिअरमध्ये चांगला लाभ मिळेल, तसेच, तुमच्यातील नेतृत्वक्षमता दिसून येईल. शनि तुमच्या वाणीला अधिक प्रभावशाली बनवेल. तसेच, तुमच्या भौतिक सुख-संपत्तीत चांगली वाढ पाहायला मिळेल.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीसाठी शतांक योग फार अनुकूल ठरमार आहे. या राशीच्या लग्न भावात शनि आणि नवम भावात सूर्य विराजमान आहे. त्यामुळे तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तुमच्या कर्माचं तुम्हाला चांगलं फळ मिळेल. तसेच, धार्मिक कार्यात तुमची रुची वाढलेली दिसेल. तुम्ही हाती घेतलेल्या कार्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. तसेच, धार्मिक कार्यात तुमची रुची वाढलेली दिसेल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शतांक योग फार लाभदायी ठरणार आहे. या काळात नशिबाची तुम्हाला चांगली साथ मिळेल. शिक्षण क्षेत्रात तुमचा चांगला विकास होईल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळण्याची संधी आहे. तुमच्या पगारात चांगली वाढ होईल. अनेक दिवसांपासून रखडलेली तुमची कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















