Navratri 2022 : नवरात्र (Navratri 2022) हे देवीच्या साधनेसाठी सर्वात शुभ आणि फलदायी मानले जाते. दुर्गा देवीच्या उपासनेशी संबंधित नवरात्रोत्सव वर्षातून चार वेळा साजरा केला जातो, त्यापैकी चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्रीशिवाय दोन गुप्त नवरात्री असतात. शारदीय नवरात्री मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते आणि याच काळात दुर्गापूजाही होते. यावर्षी शारदीय नवरात्रीचा पवित्र पर्व 26 सप्टेंबर 2022 पासून सुरू होणार असून 05 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. नवरात्रीच्या काळात भक्त नऊ दिवस मोठ्या विधीपूर्वक देवी दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा करतात. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी कलशाची स्थापना करून दुर्गा सप्तशतीचे पठण सुरू केले जाते. जाणून घ्या दुर्गा देवीच्या उपासनेशी संबंधित मुख्य तिथी, उपासनेची पद्धत आणि तिची शुभ वेळ, भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात


भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारी नवरात्र
अशी मान्यता आहे की, नवरात्रीचे नऊ दिवस देवीची विशेष पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, नवरात्रीचा प्रत्येक दिवस देवीच्या एका रूपाला समर्पित असतो. त्या दिवशी मातेच्या त्या रूपाची पूजा, आराधना आणि नामस्मरण असा नियम आहे. चला जाणून घेऊया दुर्गापूजेच्या मुख्य तारखांबद्दल


नवरात्रीच्या महत्वाच्या तिथी
नवरात्रीचा पहिला दिवस: 26 सप्टेंबर 2022, सोमवार - प्रतिपदा (देवी शैलपुत्री)
नवरात्रीचा दुसरा दिवस: 27 सप्टेंबर 2022, मंगळवार - द्वितीया (देवी ब्रह्मचारिणी)
नवरात्रीचा तिसरा दिवस: 28 सप्टेंबर 2022, बुधवार - तृतीया (देवी चंद्रघंटा)
नवरात्रीचा चौथा दिवस: 29 सप्टेंबर 2022, गुरुवार - चतुर्थी (देवी कुष्मांडा)
नवरात्रीचा पाचवा दिवस: 30 सप्टेंबर 2022, शुक्रवार - पंचमी (देवी स्कंदमाता)
नवरात्रीचा सहावा दिवस: 01 ऑक्टोबर 2022, शनिवार - षष्ठी (देवी कात्यायनी)
नवरात्रीचा सातवा दिवस: 02 ऑक्टोबर 2022, रविवार - सप्तमी (देवी कालरात्री)
नवरात्रीचा आठवा दिवस: 03 ऑक्टोबर 2022, सोमवार - अष्टमी (देवी महागौरी)
नवरात्रीचा नववा दिवस: 04 ऑक्टोबर 2022, मंगळवार - नवमी (देवी सिद्धिदात्री)
दुर्गा विसर्जन दिवस: 05 ऑक्टोबर 2022, बुधवार - दशमी (देवी दुर्गा मूर्तीचे विसर्जन)


संबंधित बातम्या


Navratri Puja 2022 : नवरात्रीत देवीच्या नऊ रूपांचे ध्यान; जाणून घ्या श्लोक, मंत्र आणि पूजा


Navratri Puja 2022 : नवरात्रीत घटस्थापनेचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत जाणून घ्या