Navratri Puja 2022 : नवरात्रीचा सण हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. नवरात्रीमध्ये पार्वतीच्या नऊ रुपांची पूजा (Navratri Puja 2022) केली जाते. अशा प्रकारे प्रत्येक दिवशी मातेच्या विविध रूपांचे वेगवेगळे मंत्र आहेत जे खालीलप्रमाणे आहेत -

नवरात्रीचा पहिला दिवस - शैलपुत्री देवीॐ देवी शैलपुत्र्यै नमः ।

शैलपुत्री प्रार्थनावन्दे वाञ्छितलाभाय चन्द्रार्ध कृतशेखराम् ।वृषारूढाम् शूलधराम् शैलपुत्रीम् यशस्विनीम् ॥

अर्थ : भक्तांना उत्तम वरदान देणाऱ्या शैला-पुत्री मातेला मी नमस्कार करतो. मातेच्या कपाळावर मुकुटाच्या रूपात अर्धचंद्र शोभतो. ती बैलावर स्वार आहे. तिच्या हातात भाला आहे. ती यशस्विनी आहे - 

नवरात्रीचा दुसरा दिवस - ब्रह्मचारिणी देवीओम देवी ब्रह्मचारिणीय नम:

ब्रह्मचारिणीची प्रार्थनाया देवी सर्वभू‍तेषु माँ ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता।नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।

अर्थ : आई! अंबे, जी सर्वत्र विराजमान आहे आणि ब्रह्मचारिणी म्हणून ओळखली जाते, मी तुला वारंवार नमस्कार करतो. 

नवरात्रीचा तिसरा दिवस - चंद्रघंटा देवीओम देवी चंद्रघंटाय नम:

देवी चंद्रघंटा ध्यान मंत्रपिण्डज प्रवरारूढ़ा चण्डकोपास्त्रकैर्युता। प्रसीदम तनुते महयं चन्द्रघण्टेति विश्रुता।।

देवी चंद्रघंटाची प्रार्थनाया देवी सर्वभू‍तेषु माँ चंद्रघंटा रूपेण संस्थिता।नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।

अर्थ : आई! जी सर्वत्र आणि चंद्रघंटा म्हणून प्रसिद्ध आहे, मी तुला वारंवार नमस्कार करतो. मला सर्व पापांपासून मुक्ती दे.

नवरात्रीचा चौथा दिवस - कुष्मांडा देवीओम देवी कुष्मांडा नम:

सुरासम्पूर्णकलशं रुधिराप्लुतमेव च।दधाना हस्तपद्माभ्यां कूष्माण्डा शुभदास्तु मे॥

कुष्मांडाची प्रार्थनाया देवी सर्वभूतेषु मां कुष्मांडा रुपेणा संस्‍था ।नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ।

अर्थ : अंबे, जी सर्वत्र आणि कुष्मांडा म्हणून प्रसिद्ध आहे, मी तुला वारंवार नमस्कार करतो. मला सर्व पापांपासून मुक्ती दे.

नवरात्रीचा पाचवा दिवस - स्कंदमाताओम देवी स्कंदमाताय नम:

स्कंदमाता प्रार्थनाया देवी सर्वभूतेषु माँ स्कंदमाता रुपेणा संस्था।नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ।

अर्थ : आई! सर्वत्र आणि स्कंदमाता म्हणून प्रसिद्ध असलेल्या अंबे, तुला मी पुन: प्रणाम करतो. मला सर्व पापांपासून मुक्ती दे. भगवान स्कंदजी तिच्या मांडीवर बालकाच्या रूपात विराजमान आहेत.

नवरात्रीचा सहावा दिवस - कात्यायनी देवीओम देवी कात्यायनै नम:

स्वर्णाआज्ञा चक्र स्थितां षष्टम दुर्गा त्रिनेत्राम्।वराभीत करां षगपदधरां कात्यायनसुतां भजामि॥

चन्द्रहासोज्ज्वलकरा शार्दूलवरवाहना।कात्यायनी शुभं दद्याद्देवी दानव-घातिनी॥

कात्यायनीची प्रार्थनाया देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता।नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:॥

अर्थ : आई! सर्वत्र विराजमान असलेल्या आणि शक्ती-रुपिणी या नावाने ओळखल्या जाणार्‍या प्रसिद्ध अंबे, तुला मी वारंवार नमस्कार करतो. 

विवाहासाठी कात्यायनी मंत्रयाशिवाय ज्या मुलींच्या लग्नाला उशीर होत आहे, त्यांनी या दिवशी कात्यायनी मातेची पूजा करावी, यामुळे त्यांना इच्छित वर प्राप्त होतो.

ओम कात्यायनी महामाये महायोगिन्याधिश्वरी ।नंदगोपसुतं देवी पतिम मे कुरुते नम: ॥

नवरात्रीचा सातवा दिवस - कालरात्री देवीओम देवी कालरात्राय नम:

ॐ देवी कालरात्र्यै नम:

एकवेणी जपाकर्णपूरा नग्ना खरास्थिता।लम्बोष्ठी कर्णिकाकर्णी तैलाभ्यक्तशरीरिणी॥वामपादोल्लसल्लोहलताकण्टकभूषणा।वर्धन्मूर्धध्वजा कृष्णा कालरात्रिर्भयङ्करी॥

ॐ ऐं ह्रीं क्रीं कालरात्रै नमः |

कालरात्रीची प्रार्थनाया देवी सर्वभू‍तेषु माँ कालरात्रि रूपेण संस्थिता।नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।

अर्थ : आई! अंबे, जी सर्वत्र आणि कालरात्री म्हणून प्रसिद्ध आहे, मी तुला वारंवार नमस्कार करतो. हे माते, मला पापापासून मुक्त कर.

नवरात्रीचा आठवा दिवस - महागौरी देवीॐ देवी महागौर्यै नमः

सर्वमंगल मांगल्ये, शिव सर्वार्थ साधिके ।शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ।

श्वेते वृषे समारूढा श्वेताम्बरधरा शुचिः।महागौरी शुभं दद्यान्महादेव-प्रमोद-दा॥

महागौरीची प्रार्थनाया देवी सर्वभू‍तेषु माँ गौरी रूपेण संस्थिता।नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।

अर्थ :  आई! अंबे, जी सर्वत्र आणि देवी गौरी म्हणून प्रसिद्ध आहे, मी तुला वारंवार नमस्कार करतो. हे आई, मला सुख आणि समृद्धी दे.

नवरात्रीचा नववा दिवस - सिद्धिदात्री देवीसिद्धगन्धर्व-यक्षाद्यैरसुरैरमरैरपि।सेव्यमाना सदा भूयात् सिद्धिदा सिद्धिदायिनी।।

गंधर्व + यक्ष + आद्य -> ​​म्हणजे (स्वर्गातील उपदेवता, ज्यांच्यामध्ये गंधर्व, यक्ष इ. आदि आहेत), आणि असुर (राक्षस), अमर (देव) 

वन्दे वांछित मनोरथार्थ चन्द्रार्घकृत शेखराम्।कमलस्थितां चतुर्भुजा सिद्धीदात्री यशस्वनीम्॥स्वर्णावर्णा निर्वाणचक्रस्थितां नवम् दुर्गा त्रिनेत्राम्।शख, चक्र, गदा, पदम, धरां सिद्धीदात्री भजेम्॥

सिद्धिदात्रीची प्रार्थनाया देवी सर्वभू‍तेषु सिद्धिदात्री रूपेण संस्थिता।नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।

अर्थ :  आई! सर्वत्र माता सिद्धिदात्री या नावाने प्रसिद्ध असलेल्या अंबे, तुला मी वारंवार नमस्कार करतो.  हे आई, माझ्यावर तुझी कृपा सदैव असू दे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :