Lakhimpur Two Minor Girls Rape Case : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर (Lakhimpur) येथे दोन सख्ख्या बहिणींवर अत्याचार करुन त्यांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) यांनी पीडित मुलींच्या कुटुंबियांनी 25 लाखांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात घेण्याचे आदेश दिले असून दोषींना एका महिन्यात शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी सध्या सहा आरोपींना अटक केली आहे. त्यांची चौकशी सुरु असून त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 


दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून हत्या


लखीमपूर खीरी येथील शेतात बुधवारी एका झाडाला दोन अल्पवयीन मुलींचे मृतदेह लटकलेल्या स्थितीत आढळले. या दोन अल्पवयीन बहिणांवर बलात्कार करुन त्यांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली. पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या मुलींचं वय 15 आणि 17 वर्ष असून त्यांच्यावर अत्याचार करुन त्यानंतर त्यांची गळा दाबून हत्या करण्यात आली. त्याच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या झाडाला त्यांचे मृतदेह लटकवण्यात आले होते. त्यानंतर गुरुवारी या प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 


काय आहे प्रकरण?


उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर (Lakhimpur) येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी दोन सख्ख्या बहिणींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळले. कोतवाली येथे ही घटना घडली आहे. या दोन्ही मुलींचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ माजली होती. निघासन  पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरणाची चौकशी सुरु केली. त्यानंतर तपासादरम्यान मुलींवर अत्याचार झाल्याची बाब समोर आली. दोन सख्ख्या बहिणींचं अपहरण करुन त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले. त्यानंतर त्यांची गळा दाबून हत्या करून त्यांचे मृतदेह झाडाला लटकवण्यात आले. कुटुंबियांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रकरणाचा तपास करण्यात येईल आणि आरोपींना कठोर शिक्षा देण्यात येईल, असंही पोलिसांनी सांगितलं आहे.


दोषींना एका महिन्यात शिक्षा होईल : मुख्यमंत्री


मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पीडित मुलींच्या कुटुंबियांनी 25 लाखांची मदत जाहीर केली आहे. या शिवाय पीडित कुटुंबियाला पक्कं घर आणि शेतीसाठी जमीन देण्याची घोषणा केली आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींना एका महिन्यात शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं आहे