Navratri Puja 2022 : पितृपक्ष संपताच शारदीय नवरात्रीला सुरुवात होईल. हिंदू धर्मात नवरात्रोत्सवाला विशेष महत्त्व आहे. यावेळी नवरात्री 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2022 या कालावधीत होणार आहे. असे मानले जाते की नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवी कैलास पर्वतावरून पृथ्वीवर येते. नवरात्रीचे 9 दिवस मातेच्या 9 वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. याशिवाय देवी दुर्गेच्या पूजेसह 9 दिवसांचा उपवासही ठेवला जातो. घटस्थापना (Ghatstahpana) नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच प्रतिपदेला केली जाते.
शारदीय नवरात्रीला दुर्गा मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त 26 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 06:28 ते 08:01 पर्यंत असा असेल. तर अश्विन नवरात्रीची प्रतिपदा तिथी 26 सप्टेंबर 2022 रोजी पहाटे 3.23 वाजता सुरू होईल आणि 27 सप्टेंबर 2022 रोजी पहाटे 3.08 वाजता समाप्त होईल
शारदीय नवरात्रीचा घटस्थापना शुभ मुहूर्त
घट स्थापना तारीख: 26 सप्टेंबर 2022, सोमवार
घटस्थापना मुहूर्त: 26 सप्टेंबर 2022 सकाळी 06:28 ते 08:01 पर्यंत
एकूण कालावधी 01 तास 33 मिनिटे
घटस्थापना पूजा विधी
-नवरात्रीत सर्व प्रकारची शुभ कार्ये करता येतात. या दिवशी देवी भक्तांच्या घरी येते, शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला स्वस्तिक बनवावे आणि दारावर आंब्याचे तोरण आणि अशोकाच्या पानांचा तोरण लावावे.
-नवरात्रात मातेची मूर्ती लाकडी चौकटीवर किंवा आसनावर बसवावी. जिथे मूर्ती किंवा चित्र स्थापित केले असेल तिथे प्रथम स्वस्तिक चिन्ह बनवावे. त्यानंतर रांगोळी व अक्षता यांचे मिश्रण करून तेथे मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. त्यानंतर विधिपूर्वक मातेची पूजा करावी.
-उत्तर आणि ईशान्य दिशा म्हणजेच ईशान्य हे पूजेसाठी सर्वोत्तम स्थान मानले जाते. जर तुम्हीही दरवर्षी कलशाची स्थापना करत असाल तर कलश या दिशेला ठेवून आईच्या घटस्थापनेची सजावट करावी.
-शास्त्रात कलशावर नारळ ठेवण्याबद्दल सांगितले आहे की “अधोमुखं शत्रु विवर्धनाय, ऊर्धवस्य वस्त्रं बहुरोग वृध्यै। प्राचीमुखं वित विनाशनाय, तस्तमात् शुभं संमुख्यं नारीलेलंष्। म्हणजेच कलशावर नारळ ठेवताना नारळाचे मुख खालच्या दिशेला असता कामा नये हे ध्यानात ठेवावे.
शारदीय नवरात्री 2022 चा शुभ योग
पहिला दिवस - माता शैलपुत्री देवी -सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग
दुसरा दिवस -ब्रह्मचारिणी देवी
तिसरा दिवस - चंद्रघंटा देवी
चौथा दिवस - कुष्मांडा देवी - रवि योग
पाचवा दिवस - स्कंदमाता देवी - सर्वार्थ सिद्धी योग
सहावा दिवस - कात्यायनी देवी - रवि योग
सातवा दिवस - कालरात्री देवी - सर्वार्थ सिद्धी योग
आठवा दिवस - महागौरी देवी - रवि योग
नववा दिवस - सिद्धिदात्री देवी
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :