Shani Vakri : तब्बल 30 वर्षांनंतर शनीचा मीन राशीत प्रवेश; 2025 पर्यंत 'या' 3 राशींचाच होणार उद्धार, सुरुवात आत्तापासूनच
Shani Vakri : द्रिक पंचांगानुसार, शनी मीन राशीत 13 जुलै 2025 रोजी सकाळी 9 वाजून 36 मिनिटांत वक्री होणार आहे ते जवळपास 138 दिवस वक्री अवस्थेत असणार आहे.
Shani Vakri : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, न्यायदेवता शनी (Shani Dev) हा सर्वात हळुवार गतीने चालणारा ग्रह मानला जातो. शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करण्यासाठी जवळपास अडीच महिन्यांचा कालवधी लागतो. तर, एक राशीचक्र पूर्ण करण्यासाठी जवळपास 30 वर्ष लागतात. सध्या शनी कुंभ राशीत स्थित आहे. त्यामुळे काही राशींना (Zodiac Signs) याचा फायदा तर काहींना तोटा होऊ शकतो.
तर, नवीन वर्ष 2025 च्या मार्च महिन्यात शनी पुन्हा एकदा राशी परिवर्तन करुन मीन राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे काही राशीच्या लोकांना बंपर लाभ मिळू शकतो. या राशी नेमक्या आहेत ते जाणून घेऊयात. द्रिक पंचांगानुसार, शनी मीन राशीत 13 जुलै 2025 रोजी सकाळी 9 वाजून 36 मिनिटांत वक्री होणार आहे ते जवळपास 138 दिवस वक्री अवस्थेत असणार आहे.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या एकादश भावात शनी वक्री होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळू शकतो. यामुळे तुमच्या आयुष्यात एक प्रकारे स्थिरता येईल. तसेच, विद्यार्थ्यांच्या अभ्यासात येणाऱ्या समस्या हळूहळू संपतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहयोगाने तुमचं काम अगदी सहज सोपं होईल. तसेच, नोकरीत पदोन्नतीसह वेतनवाढही होईल. एकूणच तुमची आर्थिक स्थिती चांगली असणार आहे.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या आठव्या चरणात शनी वक्री होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांची अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या मेहनतीला चांगलं फळ मिळेल. कामाच्या ठिकाणी जे चढ-उतार सुरु होते ते हळूहळू संपुष्टात येतील. तसेच, ज्या तरुणांना नवीन नोकरी शोधायची आहे त्यांनी चांगल्या नोकरीची संधी मिळेल. त्याचबरोबर दिलेल्या संधीचा गैरफायदा घेऊ नका. अन्यथा तुम्हीच यामध्ये सापडू शकतात.
कर्क रास (Cancer Horoscope)
शनी या राशीच्या नवव्या चरणात वक्री होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, कुटुंबात सुरु असलेले वादविवाद संपुष्टात येतील. तुम्हाल अचानक धनलाभही होऊ शकतो. तसेच, अनेक दिवसांपासून तुमच्या मनात जी इच्छा आहे ती पूर्ण होण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: