Shani Vakri 2025 : दु:ख, कष्ट आणि एकामागोमाग संकटं...शनीच्या वक्री चालीमुळे 'या' राशी येणार कात्रीत; होणार प्रचंड हाल
Shani Vakri 2025 : येत्या 13 जुलै रोजी शनी महाराज आपली चाल बदलणार आहेत. शनिदेव मीन राशीत वक्री होणार आहेत. यामुळे अनेक राशींच्या संकटात वाढ होणार आहे.

Shani Vakri 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांच्या वक्री चालीला विशेष महत्त्व आहे. कारण ग्रहांच्या वक्री चालीचा सर्व 12 राशींवर परिणाम होतो. त्यानुसार, येत्या 13 जुलै रोजी शनी महाराज (Shani Dev) आपली चाल बदलणार आहेत. शनिदेव मीन राशीत वक्री होणार आहेत. ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला विशेष स्थान आहे. जेव्हा शनीदेवाचा प्रभाव शुभ असतो तेव्हा व्यक्ती राजासारखं आयुष्य जगतो. तर, ग्रहांचा अशुभ प्रभाव असेल तर व्यक्तीला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. आता शनीच्या वक्री चालीमुळे कोणत्या राशींना सावधान राहण्याची गरज आहे ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
शनीच्या वक्री चालीमुळे मेष राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होणार आहे. या काळात तुम्हाला नवीन प्रॉपर्टी विकत गेण्यात अनेक अडचणी येऊ शकतात. तसेच, या काळात आरोग्याच्या बाबतीत देखील कोणताच हलगर्जीपणा करु नका. कोणाशी वादविवाद करु नका. अन्यथा तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच, या काळात तुम्ही तुमच्या कामाप्रती प्रामाणिक असणं आणि वाणीवर नियंत्रण ठेवणं फार गरजेचं आहे. तरच तुमचे संबंध टिकून राहतील. अन्यथा नाती दुरावण्याची शक्यता आहे.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
शनीच्या वक्री चालीमुळे कुंभ राशीच्या जीवनात देखील अनेक बदल दिसून येतील. या काळात तुमच्या आयुष्यात अनेक चढ-उतार येतील. तसेच, तुमच्या मान-सन्मानाला ठेच लागू शकते. बॉसकडून तुमचा अपमान होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. यासाठी तुम्ही नियमित ध्यान करणं गरजेचं आहे.
मीन रास (Pisces Horoscope)
शनीच्या वक्री चालीचा परिणाम मीन राशीवर देखील होणार आहे. या काळात तुमच्या मनाविरुद्ध गोष्टी घडतील. ज्याचा तुम्हाला मनस्ताप होईल. मात्र, कोणत्याही गोष्टी घाईगडबडीत किंवा भावनिक होऊन घेऊ नका. अन्यथा नंतर त्याचा तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो. आर्थिक बाबतीत थोडी सावधानता बाळगा. विनाकारण पैसे खर्च करु नका. तसेच, या काळात कोणताही लांबचा प्रवास करु नका. दुखापत होण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















