Shani Shukra Gochar : वैदिक ज्योतिषशास्त्रात, देशाच्या भविष्यासाठी आणि व्यक्तीच्या उज्वल आयुष्यासाठी ग्रहांच्या संक्रमणास विशेष महत्त्व दिलं जातं. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा एखादा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो तेव्हा त्याचा माणसाच्या जीवनावर खोलवर परिणाम होतो. जेव्हा एकाच राशीत दोन किंवा अधिक ग्रह एकत्र येतात, त्याला ग्रहांचा संयोग म्हणतात. याच ग्रहांच्या संयोगाचा किंवा ग्रहांच्या युतीचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर होतो. असाच ग्रहयोग या महिन्यात, म्हणजेच मार्च महिन्यात होणार आहे.


शुक्र-शनि संयोगाची वेळ


मार्चमध्ये कुंभ राशीमध्ये शनि (Shani) आणि शुक्राची युती होईल. या युतीमुळे काही राशींच्या लोकांचं नशीब उजळेल. शनि आधीच कुंभ राशीत आहे, तर शुक्र 7 मार्चला सकाळी 10:33 वाजता कुंभ राशीत प्रवेश करेल आणि शनि-शुक्राची युती होईल. शनि आणि शुक्राचा संयोग अनेक राशींना शुभफळ देईल. आर्थिक लाभ आणि यशाची भरभराट देईल. या दोन ग्रहांच्या युतीमुळे कोणत्या 5 राशींचं भाग्य उजळणार? जाणून घेऊया.


वृषभ रास (Taurus)


कुंभ राशीत शुक्र-शनि संयोग निर्माण झाल्यामुळे वृषभ राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. या काळात या राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल, ज्यामुळे करिअर आणि महत्वाच्या कामात त्यांना यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी प्रगतीच्या संधी मिळतील. नोकरी-व्यवसायात चांगले परिणाम मिळतील. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळेल. या काळात तुम्हाला विशेष लाभ मिळतील आणि चांगली बातमी मिळेल. व्यवसायात वाढ होईल. 


कर्क रास (Cancer)


शुक्र आणि शनीच्या युतीमुळे कर्क राशीच्या लोकांना प्रगतीच्या नवीन संधी मिळतील. तुमच्या लव्ह लाईफमध्ये उत्साह आणि आनंद असेल. करिअरमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील. भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होऊ शकते. तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तुमची प्रलंबित कामं पूर्ण होतील. समाजात तुम्हाला मान आणि प्रतिष्ठा मिळेल. नोकरी आणि वैयक्तिक जीवनात प्रगती होईल. तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोतही निर्माण होतील. 


तूळ रास (Libra)


शनि-शुक्राची युती तूळ राशीसाठी फायद्याची ठरेल. तूळ राशीचा स्वामी शुक्र हा शनिसोबत एकत्र येणार आहे, या काळात तूळ राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळेल. तुमच्या संपत्तीत अचानक वाढ होईल. नोकरदार नवीन नोकरीसाठी चांगली संधी, चांगले पर्याय मिळू शकतात. तुम्हाला गुंतवणुकीशी संबंधित फायदे मिळू शकतात. व्यापारी वर्गाला यावेळी मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक सदस्यांसोबत तुमचे संबंध अधिक घट्ट होतील.


मकर रास (Capricorn)


शनि आणि शुक्र यांच्या संयोगामुळे मकर राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये चांगल्या संधी मिळतील. सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. आर्थिक लाभाच्या उत्तम संधी मिळतील. वैवाहिक जीवन चांगलं राहील. व्यवसायात खूप प्रगती होईल. नोकरीत प्रमोशनही मिळू शकते. शनीच्या कृपेने तुमचे नशीब उजळेल. 


कुंभ रास (Aquarius)


तुमच्या राशीमध्ये होत असलेल्या शनि आणि शुक्र यांच्या युतीमुळे तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी उत्तम यश मिळेल. तुमच्या जीवनात सकारात्मकता येईल, तुम्हाला चांगली बातमी मिळेल. भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होऊ शकते. करिअरमध्ये चांगली प्रगती होऊ शकते. लोकांशी चांगले संबंध राहतील. प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील.  या राशीच्या लोकांना मागील अनेक समस्यांपासून आराम मिळेल. या काळात तुम्ही सहलीला जाण्याची शक्यता आहे. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Mangal Gochar 2024 : मंगळ ग्रहाचं मार्गक्रमण 'या' राशींसाठी ठरणार घातक; हातातून पैसा जाणार, प्रचंड धनहानी होणार