WiFi Safety Options : जर तुम्ही वायफाय (WiFi) वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. अनेकदा वायफाय वापरत असताना अचानक आपण वायफायचा पासवर्ड (Password) विसरतो. हाच वायफाय नंतर शोधण्यात फार अडचण येते. जर, तुम्हालासुद्धा पासवर्ड वारंवार विसरण्याची सवय असेल तर चिंता करू नका. कारण आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. या टिप्सच्या मदतीने तुम्हाला वायफाय पासवर्ड लक्षात ठेवणं खूप सोपं होईल. याशिवाय, जर तुम्हाला पासवर्ड कुणासोबत शेअर करायचा असेल तर तुम्हाला या सोप्या पद्धती फॉलो कराव्या लागतील.


अँड्रॉईड फोनमध्ये पासवर्ड कसा शोधयचा?


अँड्रॉईड फोनमधील वायफायचा पासवर्ड जाणून घेण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला मोबाईलच्या सेटिंगमध्ये जावं लागेल. यामध्ये तुम्हाला WiFi चा ऑप्शन दिसेल. तसेच, इतरही अनेक वायफाय दिसतील. आता तुम्हाला जाणून घ्यायच्या असलेल्या कोणत्याही वायफाय नेटवर्कच्या पासवर्डची माहिती तुम्ही शेअर करू शकता किंवा मिळवू शकता. वायफाय नेटवर्कवर गेल्यावर तुम्हाला शेअर किंवा वायफाय क्यूआर कोडचा (QR Code) ऑप्शन दिसेल. हे केल्यानंतर, तुमच्या स्क्रीनवर QR कोड दिसू लागेल. येथे तुम्हाला WiFi पासवर्ड देखील दिसेल. आता अशा परिस्थितीत, जर एखाद्या यूजरला वायफाय कनेक्ट करायचा असेल तर त्याला फक्त हा QR कोड स्कॅन करावा लागेल.


आयफोन यूजर्स कसे कनेक्ट करू शकतात?


जर तुम्ही आयफोन यूजर्स असाल तर ही प्रक्रिया थोडी वेगळी असणार आहे. यामध्येही सर्वात आधी तुम्हाला सेटिंगमध्ये जाऊन नंतर वायफाय ऑप्शनवर जावं लागेल. यानंतर तुम्हाला कनेक्टेड नेटवर्क ऑप्शनवर जावं लागेल. यामध्ये तुम्हाला एक छोटा 'i' आयकॉन दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला फेस आयडी किंवा टच आयडीच्या ऑप्शनवर जावं लागेल. हे केल्यानंतर, तुम्हाला ऑटो-जॉईन ऑप्शनच्या खाली नेटवर्क पासवर्ड दिसेल. तो सेव्ह केल्यानंतर, तुम्ही ते इतर यूजर्ससोबत शेअर करू शकाल.


वायफाय कनेक्शनबाबतही तुम्हाला खूप सावध राहण्याची गरज आहे. तुमची एक चूक तुम्हाला खूप त्रास देऊ शकते. त्यामुळे वायफाय पासवर्ड शेअर करताना खूप काळजी घ्यावी लागेल. हे केल्यानंतर, तुम्हाला ऑटो-जॉईन ऑप्शनच्या खाली नेटवर्क पासवर्ड दिसेल. तो सेव्ह केल्यानंतर, तुम्ही ते इतर यूजर्सबरोबर शेअर करू शकाल.


महत्त्वाच्या बातम्या :


Charger Safety Tips : चार्जर वापरताय तर सावध व्हा! जीवावरही बेतू शकतं; चार्जर विकत घेताना 'या' गोष्टींची चूक करू नका