Mars Transit in Aquarius 2024: ज्योतिषशास्त्रात मंगळ हा धैर्य आणि शौर्याचा कारक मानला जातो. नऊ ग्रहांपैकी मंगळ ग्रहाला सेनापतीचा दर्जा आहे. मंगळ हा स्वभावाने अत्यंत हिंसक, रौद्र ग्रह मानला जातो. कुंडलीत मंगळाची स्थिती बलवान असेल तर व्यक्तीला सर्व प्रकारच्या सुख-सुविधा, उत्तम आरोग्य आणि कुशाग्र बुद्धिमत्ता मिळते.
ज्या लोकांच्या कुंडलीत मंगळ शुभ स्थितीत असतो, त्यांना करिअरमध्ये मान-सन्मान आणि पद मिळते. तर कुंडलीतील मंगळाच्या अशुभ स्थितीमुळे व्यक्तीचं मोठं नुकसान होऊ शकतं. मंगळ 15 मार्च 2024 रोजी सायंकाळी 05:42 वाजता कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. मंगळाचं (Mars) हे संक्रमण काही लोकांसाठी अशुभ ठरणार आहे. या काळात काही राशींना सावध राहावं लागणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
वृषभ रास (Taurus)
मंगळाच्या राशी बदलामुळे वृषभ राशीच्या लोकांना अनेक प्रकारचं नुकसान सहन करावं लागू शकतं. आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे तुम्ही त्रस्त असाल. या काळात तुमच्या खर्चात वाढ होणार आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्यावर तुम्हाला खूप पैसा खर्च करावा लागू शकतो. या काळात तुम्हाला मालमत्तेशी संबंधित वादांनाही सामोरं जावं लागू शकतं.
वृषभ राशीच्या लोकांना या काळात नोकरीत अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुम्हाला तुमची नोकरी बदलावी लागू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर कामाचा ताण वाढू शकतो. या राशीच्या लोकांना यश मिळवण्यासाठी अनेक आव्हानांना सामोरं जावं लागेल. यावेळी तुमचं कोणतेही काम सहजासहजी होणार नाही. नात्यातही अडचणी येतील.
कर्क रास (Cancer)
कर्क राशीच्या लोकांसाठी मंगळाचं संक्रमण शुभ ठरणार नाही. यावेळी तुम्ही मानसिकदृष्ट्या खूप अस्वस्थ असाल. मुलांच्या भविष्याची काळजी असेल. यावेळी तुम्ही कोणतेही बदल करू नये, अन्यथा तुम्हाला आणखी नकारात्मक परिणामांना सामोरं जावं लागू शकतं. या संक्रमणादरम्यान तुमचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
कर्क राशीच्या लोकांना या काळात अनेक प्रकारच्या खर्चाला सामोरं जावं लागू शकतं. करिअरच्या दृष्टिकोनातून मंगळाचं संक्रमण कर्क राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरणार नाही. नोकरीत तुम्हाला समाधान मिळणार नाही. या राशीच्या लोकांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे फळ मिळणार नाही. तुम्हाला व्यवसायातही मोठं नुकसान होऊ शकतं.
तूळ रास (Libra)
तूळ राशीच्या लोकांसाठी मंगळाचा राशी बदल अशुभ ठरेल. तुमच्या कामात तुम्हाला समाधान वाटणार नाही. यावेळी तुमच्या प्रगतीत अनेक अडथळे येतील. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर कामाचा ताण वाढू शकतो. तूळ राशीच्या लोकांना त्यांच्या व्यवसायात चढ-उतारांना सामोरं जावं लागू शकतं.
तूळ राशीच्या लोकांसाठी हे मार्गक्रमण आर्थिक दृष्टिकोनातून अनेक अडचणी आणणार आहे. तुमच्यावर अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या असू शकतात आणि त्यामुळे तुमचा खर्च वाढू शकतो. तुमच्या जोडीदारासोबतचं तुमचं नातं खराब होऊ शकतं. या संक्रमणादरम्यान तुम्हाला काही कौटुंबिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :