Shani Margi 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, माणसांच्या जीवनावर शनीच्या स्थितीचा मोठा परिणाम होतो. शनि (Saturn) कधी वक्री असतो, तर कधी सरळ चालीत असतो, ज्याचा परिणाम संपूर्ण जगावर होतो. कर्माचे फळ देणारा शनि जूनमध्ये वक्री झाला आहे, जो आता थेट दिवाळीनंतर सरळ चाल चालेल. शनीच्या या स्थितीचा परिणाम सर्व राशींवर दिसून येईल. परंतु अशा 3 राशी आहेत, ज्यांना शनिदेवाचा विशेष आशीर्वाद मिळेल, या राशीच्या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


मिथुन रास (Gemini)


शनीची सरळ चाल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल, यासोबतच तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्ही कामासाठी किंवा व्यावसायिक कारणांसाठी बाहेर प्रवास करू शकता. यावेळी कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध चांगले राहतील आणि वाहन आणि मालमत्ता खरेदीची शक्यता देखील निर्माण होत आहे. तसेच या काळात तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षेत यश मिळू शकते.


वृश्चिक रास (Scorpio)


वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शनीची सरळ चाल अनुकूल ठरू शकते. या काळात तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. या व्यतिरिक्त कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध चांगले राहतील . या काळात नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदारी मिळू शकते. त्याचबरोबर व्यावसायिकांना चांगला नफा होऊ शकतो. करिअर आणि व्यवसायात तुमच्या प्रगतीची शक्यता आहे.


मकर रास (Capricorn)


शनिची प्रत्यक्ष चाल तुमच्यासाठी शुभ ठरू शकते, कारण शनिदेव तुमच्या राशीचा स्वामी आहे. तुमच्या कुंडलीतील धन घरावर शनिदेवाचं थेट आगमन होणार आहे. यावेळी सामाजिक आणि धार्मिक कार्य केल्याने समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल आणि पैशाशी संबंधित समस्याही दूर होतील. त्याचबरोबर व्यावसायिकांना अडकलेले पैसे मिळू शकतात. तसेच, तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुमचा संवाद सुधारेल, ज्यामुळे लोक प्रभावित होतील.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Shadashtak Yog : सूर्यावर पडली शनीची अशुभ दृष्टी; 'या' राशींना नोकरी-व्यवसायात येणार अडचणीच अडचणी, आरोग्यावरही होणार परिणाम