Shani 2024 : शनी सध्या कुंभ राशीत वक्री अवस्थेत आहे. ऑक्टोबर महिन्यात शनि (Shani) आपलं नक्षत्र बदलेल. 3 ऑक्टोबर 2024 रोजी शनि राहूच्या शतभिषा नक्षत्रात प्रवेश करेल. शनीच्या या नक्षत्र बदलाचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होणार आहे. यावेळी शनि 27 डिसेंबर 2024 पर्यंत शतभिषा नक्षत्रात राहील.


शनि जवळपास 3 महिने राहूच्या नक्षत्रात असेल, हा काळ काही राशींसाठी लाभाचा ठरेल. शनि नक्षत्र परिवर्तनामुळे 3 राशीच्या लोकांना डिसेंबरपर्यंत अनेक लाभ मिळतील, त्यांच्या सुखसोयीत वाढ होईल. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


डिसेंबरपर्यंत 'या' राशी जगणार सुखात जीवन


मेष रास (Aries)


मेष राशीच्या लोकांना शनीच्या नक्षत्र परिवर्तनाचा पुरेपूर फायदा होईल. या काळात तुमची सर्व कामं यशस्वी होतील. तुमचं जे काही प्रलंबित काम होतं तेही या काळात पूर्ण होऊ शकतं. गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून डिसेंबरपर्यंतचा काळ तुमच्यासाठी चांगला आहे. या काळात तुमचं आरोग्य चांगले राहील आणि व्यवसायातही फायदा होईल. नोकरीत तुम्हाला काही शुभवार्ता मिळू शकते, पैशाची आवक देखील चांगली राहील.


वृषभ रास (Taurus)


वृषभ राशीच्या लोकांना शनीच्या नक्षत्र बदलाचा अधिक फायदा होईल. या काळात तुम्हाला करिअरमध्ये फायदे होतील. अनपेक्षित स्रोतांतून पैसे येतील. व्यवसायात तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होतील आणि जोडीदारासोबत तुम्ही सुखात राहाल. घरातील सदस्यांमध्ये काही वाद सुरू असतील तर ते देखील या काळात संपतील.


धनु रास (Sagittarius)


धनु राशीच्या लोकांना शनीच्या नक्षत्र बदलामुळे खूप फायदा होईल. तुमची प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होतील. व्यवसायातून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळू शकतं. तुमची सरकारी कामं लवकर पूर्ण होऊ शकतात. ज्या लोकांच्या लग्नाला उशीर होत होता, त्यांचं लग्न या काळात निश्चित होऊ शकतं. तुम्हाला अचानक धनलाभ होईल आणि उत्पन्नाचे अजून स्रोत देखील उपलब्ध होतील.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Numerology : अत्यंत साधेभोळे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; कोणीही यांना पटकन फसवतं, यांच्या साध्या स्वभावाचा लोक नेहमीच घेतात फायदा