Shadashtak Yog : ग्रहांचा राजा सूर्य (Sun) दर महिन्याला आपली राशी बदलतो. सूर्य देवाला सुख, समृद्धीचा कारक मानलं जातं, अशा स्थितीत सूर्याच्या राशीतील बदलाचा परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर होतो. ज्योतिषशास्त्रानुसार 16 सप्टेंबर रोजी सूर्याने आपली राशी बदलून कन्या राशीत प्रवेश केला. सूर्याने कन्या राशीत प्रवेश करताच त्याच्यावर शनीची (Shani) अशुभ दृष्टी पडली.
शनीची सूर्यावर अशुभ दृष्टी पडल्यामुळे षडाष्टक नावाचा धोकादायक योग (Shadashtak Yog) तयार होत आहे. षडाष्टक योगाच्या अशुभ प्रभावामुळे काही राशीच्या लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
वृषभ रास (Taurus)
या राशीच्या लोकांसाठी षडाष्टक योग अजिबात फायद्याचा ठरणार नाही. या राशीच्या लोकांना शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. यासोबतच करिअर आणि बिझनेसमध्येही अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. वाहन चालवताना थोडं लक्ष देणं आवश्यक आहे, अन्यथा अपघात होण्याची शक्यता आहे. करिअरशी संबंधित कोणताही निर्णय थोडा विचार करूनच घ्या. घाईघाईने घेतलेला निर्णय तुमच्या भविष्यासाठी अडचणी निर्माण करू शकतो. याशिवाय जर आपण व्यवसायाबद्दल बोललो तर, तुमचे काही प्रकल्प किंवा ऑर्डर रद्द होऊ शकतात. यामुळे तुमचं खूप मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं. नात्यांबाबतही थोडं सावध आणि सतर्क राहण्याची गरज आहे. अशुभ प्रभाव टाळण्यासाठी शनि आणि सूर्य मंत्राचा जप करा.
मकर रास (Capricorn)
मकर राशीच्या लोकांसाठीही षडाष्टक योग लाभदायक ठरणार नाही. शनीच्या प्रभावामुळे तुमच्या सर्व कामात काही प्रमाणात अडथळे येऊ शकतात. या काळात नोकरी-व्यवसायात थोडी काळजी घ्या. सहकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी काही मुद्द्यावर मतभेद होऊ शकतात. बॉस तुमच्या कामावर नाराज असू शकतात, त्यामुळे थोडी काळजी घेण्याची गरज आहे. या काळात तुम्ही नोकरी बदलण्याचीही शक्यता आहे. यासोबतच तुम्हाला बिझनेसमध्ये काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कुटूंबियांशी काही मुद्द्यावरून मतभेदही होऊ शकतात. आरोग्याबाबत थोडं सावध राहा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: