Shani Dev : अवघ्या 4 दिवसांवर शनीची वक्री चाल! 'या' राशीच्या लोकांसाठी पाच महिने कष्टाचे, तर 'या' भाग्यवान राशीच्या लोकांवर शनिमहाराजांची कृपा
Shani Dev : सध्या कर्क आणि वृश्चिक राशीत शनीची ढैय्या तर मकर, कुंभ आणि मीन राशीत शनीची साडेसाती सुरु आहे.
Shani Dev : कर्मफळदाता शनी (Shani Dev) सध्या आपल्या कुंभ राशीत (Aquarius Horoscope) विराजमान आहे. 29 ते 30 जूनच्या मध्यरात्री 12 वाजून 35 मिनिटांनी तो वक्री होणार आहे. साधारण 15 नोव्हेंबरपर्यंत शनी (Lord Shani) या अवस्थेतच असणार आहे. सध्या कर्क आणि वृश्चिक राशीत शनीची ढैय्या तर मकर, कुंभ आणि मीन राशीत शनीची साडेसाती सुरु आहे. शनीच्या वक्रीचा कोणत्या राशींवर कसा परिणाम होणार ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांना आपल्या कार्यात चांगलं यश मिळेल. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. व्यवसायात वाढ होईल. फक्त तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी देखील हा काळ चांगला असणार आहे. तुम्ही केलेल्या मेहनतीचं तुम्हाला फळ मिळेल. तसेच, जर तुम्हाला या काळात एखादं वाहन किंवा प्रॉपर्टी घ्यायची असेल तर तुम्ही ती देखील घेऊ शकता.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांमध्ये त्यांच्या व्यवहारात परिवर्तन दिसून येईल.धार्मिक स्थळाला भेट देण्याचा हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे. या काळात तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी शनीच्या वक्रीचा हा काळ काहीसा आव्हानात्मक असणार आहे. तुम्हाला तब्येतीच्या अनेक छोट्या-मोठ्या तक्रारी जाणवतील. कामाच्या ठिकाणी अडथळ्यांचा सामना करावा लागेल.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांना या काळात संघर्षाचा सामना करावा लागेल. तसेच, नवीन माणसांशी तुमच्या ओळखी होतील. व्यवसायात परिवर्तन दिसेल.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांच्या वैवाहिक तसेच कौटुंबिक जीवनात काहीसा तणाव पाहायला मिळेल. तुम्हाला सांधेदुखी तसेच, डोळ्यांच्या संदर्भात समस्या जाणवू शकतात.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी किंवा शैक्षणिक कार्यात तुम्हाला परिवर्तन दिसून येईल. तुमचे अनेक नवीन संपर्क वाढतील.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांचा अनेक दिवसांपासून सुरु असलेला वाद संपेल. तसेच, सर्वच कार्यक्षेत्रात तुम्हाला अधिक मेहनत घेण्याची गरज आहे.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ असणार आहे. या काळात तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ संघर्षाचा असेल. पण तुम्ही केलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. तसेच, तुमच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येईल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांना व्यवसायात चांगलं यश मिळेल. यावेळी तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी शनीच्या वक्रीचा काळ काहीसा खर्चिक असणार आहे. तुम्हाला सर्वच कार्यात थोडा संयम ठेवण्याची गरज आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :