(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shani Dev : दिवस उरले अवघे 5! शनीची वक्री चाल या 3 राशींवर पडणार भारी; मानसिक तणावाबरोबरच होणार प्रचंड धनहानी
Shani Dev : शनीच्या उलट्या चालीने काही राशीच्या लोकांना फार चांगले दिवस येणार आहेत. तर, काही राशींनी या काळात विचारपूर्वक निर्णय घेणं गरजेचं आहे.
Shani Dev : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनीला (Shani Dev) कर्मफळदाता आणि न्यायाचा देवता म्हटलं जातं. शास्त्रानुसार, शनीची (Lord Shani) पूजा करणं फार शुभकारक मानलं जातं. कुंडलीत शनीच्या अशुभ प्रभावांना कमी करण्यासाठी आणि शुभ प्रभाव वाढविण्यासाठी ज्योतिष शास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. येत्या 30 जून रोजी मध्य रात्री 12 वाजून 35 मिनिटांनी शनी कुंभ राशीत उलटी चाल सुरु करणार आहे.
शनीच्या उलट्या चालीने काही राशीच्या लोकांना फार चांगले दिवस येणार आहेत. तर, काही राशींनी या काळात विचारपूर्वक निर्णय घेणं गरजेचं आहे. असं म्हणतात की, शनी पुढचे 139 दिवस वक्री अवस्थेत असणार आहे. शनीच्य उलट्या चालीचा कोणत्या राशींवर (Zodiac Signs) परिणाम होणार आहे ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
ज्योतिष शास्त्रानुसार, शनीच्या कुंभ राशीत उलटी चाल चालल्याने वृषभ राशीच्या लोकांवर फार गंभीर परिणाम होणार आहे. या दरम्यान तुमच्या कार्यक्षेत्रावर याचा प्रभाव दिसून येईल. या दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर तुमचे मतभेद वाढू शकतात. तुमच्या करिअरमध्ये चढ-उतार दिसून येतील. कोणत्याही वाद-विवादापासून दूर राहा. या दरम्यान तुम्ही कुटुंबातील सदस्यांबरोबर जपून व्यवहार करणं गरजेचं आहे.
कर्क रास (Cancer Horoscope)
शनीला न्यायदेवताही म्हटलं जातं. शनी प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. शनीच्या उलट्या चालीने कर्क राशीच्या लोकांवर देखीव प्रभाव दिसून येणार आहे. या राशीच्या लोकांनी पुढचे काही दिवस वाहनाचा वापर करताना जपून करावा. तसेच, कामाप्रती तुम्ही कोणताही निष्काळजीपणा करू नका. नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी मानसिक तणाव जाणवेल. तसेच, तुमच्या आरोग्यावर देखील याचा परिणाम दिसून येईल.
सिंह रास (Leo Horoscope)
शनीला छाया पुत्र या नावाने देखील ओळखलं जातं. अशातच सिंह राशीच्य लोकांवर याचा फार गंभीर परिणाम दिसून येणार आहे. या दरम्यान तुमच्या कार्यक्षेत्राबरोबरच तुमच्या वैवाहिक जीवनाताही अडथळे दिसून येतील. या काळात तुम्ही रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. अन्यथा तुमच्या हातातून अनेक कामे सुटतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :