(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shani Dev : शनीमुळे जुळून येणार शश राजयोग; 'या' 3 राशींच्या सुख-संपत्तीत होणार वाढ
Shani Dev : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनी सध्या आपली मूळ रास म्हणजेच कुंभ राशीत विराजमान आहे. या ठिकाणी शश राजयोग निर्माण झाला आहे.
Shani Dev : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनीला कर्मफळदाता म्हणून ओळखलं जातं. शनी (Lord Shani) हा सर्व ग्रहांपैकी सर्वात क्रूर ग्रह मानला जातो. शनी (Shani Dev) प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देतो. त्याचबरोबर शनी हा एकमेव असा ग्रह आहे ज्याच्याकडे साडेसाती आणि ढैय्याचा अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येक राशीच्या लोकांना आयुष्यात एकदा तरी शनीच्या साडेसातीचा सामना करावा लागतो.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनी सध्या आपली मूळ रास म्हणजेच कुंभ राशीत विराजमान आहे. या ठिकाणी शश राजयोग निर्माण झाला आहे. कुंभ राशीत शनी मार्च 2025 पर्यंत असणार आहे. त्यामुळे याचा काही राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळणार आहे. या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या दहाव्या चरणात शनी विराजमान आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्हाला यश मिळेल. तसेच, अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. कामानिमित्त तुम्हाला परदेशात जाण्याची संधीदेखील मिळू शकते. तसेच, बेरोजगार लोकांना लवकरच चांगली नोकरी मिळेल.
सिंह रास (Leo Horoscope)
शनीचं कुंभ राशीत असणं सिंह राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या राशीच्या सातव्या चरणात शनी ग्रह विराजमान आहे. त्यामुळे या काळात तुमच्या व्यवसायात चांगली वाढ होईल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. तसेच, उत्पन्नाच्या अनेक संधी तुमच्यासमोर उपलब्ध होतील. जोडीदाराचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ फार महत्त्वाचा ठरणार आहे. तुमच्या वैवाहिक जीवनात गोडवा असेल. तसेच, तुम्हाला जर नोकरी बदलायची असेल तर त्यासाठी हा काळ चांगला ठरणार आहे. विद्यार्थ्यांचं देखील अभ्यासात चांगलं मन रमेल. तुम्हाला परीक्षेला चांगले गुण मिळतील. जोडीदाराच्या सहकार्याने तुम्ही सर्व योजना आखून पूर्ण करु शकता. या काळात तुमच्या मेहनतीचं चांगलं फळ तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Horoscope Today 14 September 2024 : आज शनिवारचा दिवस कोणत्या राशींसाठी ठरणार भाग्याचा? वाचा सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य