Shani Dev : वक्री झाली आता शनीची सरळ चाल; पुढच्या 125 दिवसांनी 'या' 3 राशींचं नशीब लख्खं उजळणार
Shani Dev : शनी सध्या वक्री चालमध्ये संक्रमण केलं होतं. आता काही दिवसांतच शनी सरळ चाल करण्यास सुरुवात करणार आहे.
Shani Dev : ज्योतिष शास्त्रानुसार, न्यायाचा देवता शनी (Shani Dev) सध्या कुंभ राशीत विराजमान आहे. मागच्या वर्षी शनीने (Lord Shani) कुंभ राशीत संक्रमण केलं होतं ते मे महिन्यात मीन राशीत प्रवेश करणार आहे. शनी सध्या वक्री चालमध्ये संक्रमण केलं होतं. आता काही दिवसांतच शनी सरळ चाल करण्यास सुरुवात करणार आहे. त्यामुळे शनीचं हे संक्रमण काही राशींच्या लोकांसाठी लाभदायक असणार आहे. शनीच्या सरळ चालीचा नेमका कोणत्या राशींवर परिणाम होणार आहे. तसेच, कोणत्या राशीला (Zodiac Signs) भाग्याची साथ मिळेल याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
आपल्या सर्वांनाच माहित आहे की, शनीला न्यायदेवता म्हणून म्हटलं जातं. शनी प्रत्येक व्यक्तीला आपल्या कर्मानुसार फळ देतो. त्यानुसार, शनीच्या वक्री चालीनंतर आता शनी सरळ चाल चालणार आहे. शनीच्या या चालीचा तीन राशींना फायदा होणार आहे.
सिंह रास (Leo Horoscope)
शनीची सरळ चाल सिंह राशीच्या लोकांसाठी फार शुभ ठरणार आहे. तुमच्या आयुष्यात आतापर्यंत जी काही संकटं आली ती शनीच्या येण्याने हळुहळू कमी होतील. समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. या काळात तुम्हाला जर एखादी धार्मिक यात्रा करायची असेल तर त्यासाठी चांगला योग आहे.
धनु रास (Sagittarius Horoscope)
शनीच्या सरळ चालीचा धनु राशीवर चांगला परिणाम होणार आहे.या राशींचे लवकरच चांगले दिवस सुरु होणार आहेत. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल.तुम्ही करत असलेल्या योजनांना चांगलं यश येईल. नोकरदार वर्गातील लोकांना तुम्ही करत असलेल्या मेहनतीचं तुम्हाला चांगलं फळ मिळेल. तुमच्या कामाचं सगळेजण कौतुक करतील. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर मोठमोठ्या जबाबदाऱ्या सोपविण्यात येतील.
मिथुन रास (Gemini Horoscope)
शनीची सरळ चाल मिथुन राशीच्या लोकांसाठी फार फायदेशीर ठरणार आहे. करिअरच्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी तुमच्या कलात्मक ऊर्जेला वाव देणारा आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा तसेच मित्र-परिवाराचा तुम्हाला चांगला सहवास लाभेल. याचबरोबर व्यवसायात तुम्ही ज्या व्यवसायात प्रगती करू इच्छितात त्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :