Shani Dev : तब्बल 30 वर्षांनंतर शुक्र आणि शनीची होणार युती; 'या' 3 राशींच्या शिक्षण, करिअर आरोग्यासह धन-संपत्तीत होणार वाढ
Shani Dev : शनी सध्या आपल्या स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत विराजमान आहे तर डिसेंबर महिन्यात शुक्र कुंभ ऱाशीत प्रवेश करणार आहे.
Shani Dev : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांची स्थिती ही वेळोवेळी बदलत असते. एका ठराविक अंतराने ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करतात. याचा परिणाम मानवी जीवनावर होतो. शनी (Shani Dev) सध्या आपल्या स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत विराजमान आहे तर डिसेंबर महिन्यात शुक्र कुंभ ऱाशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे कुंभ राशीत शनी (Lord Shani) आणि शुक्राची युती दिसून येईल. यामुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. या लकी राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी शनी आणि शुक्र ग्रहाची युती लाभदायक ठरू शकते. कारण या दोन्ही ग्रहांची युती तुमच्या कुंडलीतील लग्न भावाशी जोडली असल्यामुळे याचा तुम्हाला लाभ मिळणार आहे. या काळात तुमचं व्यक्तिमत्व चांगलं उठून दिसेल. तुमच्या उत्पन्नात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमच्या कामावर वरिष्ठ अधिकारी खुश असतील. वैवाहिक जीवन आनंदी असेल.
वृषभ रास (Taurus Horoscope)
शुक्र आणि शनीची युती वृषभ राशीच्या लोकांसाठी फार अनुकूल ठरू शकते. तुमच्या कुंडलीत हा योग कर्म भावात असल्या कारणाने तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. या काळात तुम्ही जे कार्य हाती घ्याल त्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. आर्थिक दृष्टीने तु्म्ही समृद्ध असाल. व्यावसायिकांना कामाच्या नवीन ऑर्डर्स मिळू शकतात. तसेच, तुमच्या बिझनेस पार्टनरबरोबर तुम्ही एकत्र चांगल्या डील करु शकता.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी शनी आणि शुक्र ग्रहाची युती फार लाभदायक ठरु शकते. या दरम्यान तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, धार्मिक कार्यात तुमची रुची वाढलेली दिसेल. कामानिमित्त तुम्हाला परदेशी जाण्याची संधी देखील मिळू शकते. उत्पन्नाचे अनेक नवीन मार्ग खुले झाल्यामुळे तुम्ही निश्चिंत राहाल. या काळात तुम्हाला तुमच्या मित्रांची चांगली साथ मिळेल. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहाल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Astrology : आज सौभाग्य योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; देवी लक्ष्मी 'या' 5 राशींवर होणार प्रसन्न