Shani Dev : तुमच्या घरी शनिदेवाची मूर्ती किंवा फोटो नाही ना? असेल तर, एकदा ही बातमी वाचाच, कारण जाणून घ्या
Shani Dev : घरात शनिदेवाची मूर्ती किंवा चित्र घरात ठेवण्यास मनाई आहे. पण यामागचे कारण काय, जाणून घेऊया.
Shani Dev : शास्त्रांमध्ये शनिदेवाला न्यायाची देवता म्हटले आहे. त्यांची पूजा केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते. असे म्हणतात की ज्यावर शनिदेवाची कृपा असते, त्याच्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमतरता नसते. पण ज्यावर शनीची वाईट नजर पडते त्याचे वाईट दिवस सुरू होतात. असे म्हणतात.
घरात पूजा करायला मनाई का आहे?
हिंदू धर्मात मूर्तीपूजेला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक घरात देवी-देवतांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना व पूजा केली जाते. शिव-पार्वती, राधा-कृष्ण, गणेशजी, राम-सीता, श्रीहरी विष्णू, लक्ष्मीजी, देवी दुर्गा यांसारख्या अनेक देव-देवतांच्या मूर्ती किंवा चित्रे ठेवून लोक पूजा करतात. पण काही देवी-देवता अशा आहेत ज्यांच्या मूर्ती घरी बसवायला किंवा घरात पूजा करायला मनाई आहे. शनिदेव हे त्यापैकीच एक. आपल्या घरी अनेक देवी-देवतांची पूजा केली जाते. पण शनिदेवाची पूजा करण्यासाठी आपण शनि मंदिरात जातो. कारण शनिदेवाची पूजा शनि मंदिरातच केली जाते. शास्त्रात शनिदेवाची मूर्ती किंवा चित्र घरात ठेवण्यास मनाई आहे. पण यामागचे कारण तुम्हाला माहीत आहे का? नसेल तर जाणून घ्या..
शनिदेवाची पूजा करण्यासाठी आपण शनि मंदिरातच का जातो?
शनिदेवाची पूजा करण्यासाठी लोक शनिवारी शनिदेवाच्या मंदिरात जातात. कारण शनिवार हा शनिदेवाच्या पूजेसाठी समर्पित आहे. शनिदेवाचे भक्त मंदिरात जाऊन दिवे लावतात आणि शनिदेवाची पूजा करतात. घरामध्ये शनिदेवाची पूजा न करण्याशी संबंधित एक पौराणिक कथा आहे. यानुसार शनिदेवाला शाप दिला होता की, त्यांची नजर ज्याच्यावर पडेल त्याचे नुकसान होईल.
शनिदेवांच्या पत्नीने असा कोणता शाप दिला?
पौराणिक कथेनुसार, शनिदेव हे भगवान श्रीकृष्णाचे भक्त होते आणि नेहमी कृष्णाच्या भक्तीत तल्लीन होते. एकदा शनिदेवाची पत्नी त्यांच्याकडे आली. त्यावेळीही शनिदेव कृष्णाच्या ध्यानात मग्न होते. अथक प्रयत्न करूनही शनिदेवाची पत्नी त्यांचे लक्ष विचलित करू शकली नाही आणि रागावली. रागाच्या भरात त्यांनी शनिदेवाला शाप दिला की आजच्या नंतर ज्या व्यक्तीवर शनिदेवाची नजर पडेल, त्याचे नुकसान होईल. नंतर शनिदेवाला आपली चूक समजली आणि त्यांनी आपल्या पत्नीची माफी मागितली. पण पत्नीला शाप मागे घेण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार नव्हता. त्यामुळे या घटनेनंतर शनिदेव डोके खाली करून चालतात. कारण त्यांच्या दृष्टीने कोणाचेही नुकसान होऊ नये.
त्यामुळे घरात शनिदेवाची पूजा केली जात नाही.
यामुळेच शनिदेवाच्या वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी लोक घरामध्ये शनिदेवाची मूर्ती किंवा चित्र स्थापित करत नाहीत किंवा घरात त्यांची पूजाही केली जात नाही. त्यामुळे शनि मंदिराची माहिती घेऊनच शनिदेवाची पूजा करावी. तसेच पूजा करताना केवळ शनिदेवाच्या चरणांकडेच पहावे, त्यांच्या डोळ्यात पाहू नये.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Shani Dev : तुम्हालाही 'असे' अनुभव येत असतील, तर समजून जा शनिदेव तुमच्यावर नाराज आहेत, महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या