Samsaptak Yog : आज सोमवार, 29 जानेवारीला चंद्र सिंह राशीतून कन्या राशीत जाणार असून शनि आणि चंद्र एकमेकांपासून सातव्या भावात असल्यामुळे समसप्तक योग तयार होत आहे. तसेच आज माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी, संकष्टी चतुर्थी देखील आहे. या दिवशी समसप्तक योग, शोभन योग आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्राच्या शुभ संयोगाने संकष्टी चतुर्थीचं महत्त्वही वाढलं आहे.


वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना आज तयार होत असलेल्या शुभ योगांचा विशेष फायदा होणार आहे. या राशींना धनप्राप्ती होण्याची विशेष शक्यता आहे आणि त्यांना कुटुंबातील सदस्यांकडून आवश्यक सहकार्य देखील मिळेल. या 5 भाग्यवान राशींबद्दल (Zodiac Signs) जाणून घेऊया.


मिथुन रास (Gemini)


आजचा म्हणजेच, 29 जानेवारीचा दिवस मिथुन राशीच्या लोकांसाठी शुभ असणार आहे. आज मिथुन राशीच्या लोकांची देवावरील अतूट श्रद्धा वाढेल आणि महादेवाच्या कृपेने तुम्हाला अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नफा मिळवण्यासाठी नवीन योजना आखाल आणि त्यात तुम्हाला चांगला नफाही मिळेल. घरातील वडीलधाऱ्यांशी तुम्ही मैत्रीपूर्ण संबंध राखाल, तुम्हाला काही वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याचीही शक्यता आहे. आजचा दिवस व्यावसायिकांपेक्षा नोकरदार लोकांसाठी अधिक आनंददायी असेल. विश्रांतीसोबतच त्यांना दिवसभर मनोरंजनाची संधीही मिळेल. अधिकाधिक पैसे कमावणं हे तुमचं ध्येय असेल आणि तुम्ही पैशांची बचत देखील करू शकाल.


कर्क (Cancer)


आज म्हणजेच, 29 जानेवारी हा दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी फायदेशीर असणार आहे. कर्क राशीचे लोक आज धार्मिक कार्यात रस घेतील, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. नोकरदार लोक आज चांगल्या संधींसाठी नवीन नोकरी शोधण्याचा विचार करू शकतात. तुम्हाला नवीन नोकरीच्या अनेक संधी देखील मिळतील. आज तुम्हाला व्यवसायात काही अडथळ्यांचा सामना करावा लागेल, परंतु तुम्ही तुमच्या बुद्धीने सर्व समस्यांवर मात कराल आणि तुम्हाला चांगला नफाही मिळेल. तुमचे तुमच्या आईसोबत काही वैचारिक मतभेद असतील तर ते आज दूर होतील.


कन्या रास (Virgo)


कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा म्हणजेच, 29 जानेवारीचा दिवस लाभदायक असणार आहे. आज तुमच्या धाडसात आणि शौर्यामध्ये चांगली वाढ होईल, त्यामुळे आज तुमच्यामध्ये अनेक नवीन गोष्टी जाणून घेण्याची इच्छा वाढेल. या राशीचे लोक उच्च स्तरावर पैसे कमवण्यात यशस्वी होतील. व्यावसायिक करारांमध्ये नफा मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल, ज्यामुळे नवीन व्यावसायिक संबंधही निर्माण होतील. आज तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून तसेच सार्वजनिक क्षेत्रातील अनुभवी लोकांकडून खूप काही शिकायला मिळेल. तुम्हाला मित्र आणि नातेवाईकांना भेटण्याची संधी मिळेल.


मकर रास (Capricorn)


आज म्हणजेच, 29 जानेवारीचा दिवस मकर राशीच्या लोकांसाठी खास असणार आहे. मकर राशीचे लोक आज कामात प्रगती करतील, काही नवीन कौशल्य शिकतील. तुमचे आरोग्य चांगले राहील. तुम्ही व्यवसायात अधिक नफा मिळवाल. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं झालं तर, तुमच्या जोडीदारासोबत तुमचं नातं अधिक घट्ट होईल आणि तुम्ही एकत्र एखाद्या नातेवाईकाकडे जाऊ शकता. महादेवाच्या कृपेने तुम्हाला धनलाभ होईल. तुमच्या स्वभावात कोमलता असेल आणि तुम्ही तुमच्या विरोधकांशीही नम्रतेनं वागाल.


मीन रास (Pisces)


मीन राशीच्या लोकांसाठी आजचा म्हणजेच, 29 जानेवारीचा दिवस अनुकूल असणार आहे. मीन राशीच्या लोकांच्या आनंदात आज वाढ होईल आणि ते घरातील कामात खुश दिसतील. तुमच्या घरातल्यांच्या आशीर्वादाने तुम्ही आज एक नवीन व्यवसाय सुरू करू शकता, ज्यामुळे तुम्हाला चांगला नफाही मिळेल. तुम्ही घरी काही धार्मिक कार्यक्रमही आयोजित करू शकता. नोकरदार लोकांच्या जीवनात चांगली प्रगती होईल आणि तुम्हाला कामात नवीन संधी देखील मिळतील, ज्यामुळे तुम्हाला समाधान मिळेल. व्यवसायात सुरू असलेल्या अडचणींवर तुम्ही मात करू शकाल आणि चांगला नफा मिळवण्यातही यशस्वी व्हाल. आज तुम्हाला गुंतवणुकीतून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे आणि अडकलेले पैसेही परत मिळतील.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा : 


Shani 2024 : फेब्रुवारीत शनि आणि सुर्याची होणार युती; 'या' राशींना सोसावं लागणार नुकसान, राहा सतर्क