Shani Dev : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सर्व ग्रह ठराविक कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात, काही वेळा एका राशीत दोन किंवा अधिक ग्रह एकत्र आल्याने त्यांचा संयोग होतो. अशा स्थितीत, अनेक शुभ किंवा अशुभ योग, राजयोग तयार होतात.


सूर्य हा ग्रहांचा राजा मानला जातो. सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलतो. दर महिन्यात सूर्याची राशी बदलल्यामुळे कोणाशी ना कोणाशी ग्रहाशी त्याची युती होते. फेब्रुवारीत सुर्याची पुत्र शनिसोबत युती होणार आहे.


वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, 11 फेब्रुवारीला शनि (Shani) अस्त होणार आहे, त्यानंतर 13 फेब्रुवारीला सूर्य (Sun) मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करेल. त्यावेळी कुंभ राशीत सूर्य आणि शनीचा संयोग तयार होईल. सूर्य आणि शनीचा हा संयोग 14 मार्चपर्यंत राहील. सूर्य आणि शनि यांच्यात शत्रुत्वाची भावना आहे. सूर्य-शनिचा हा संयोग सुमारे 30 वर्षांनी कुंभ राशीमध्ये तयार होत आहे. सूर्य आणि शनीच्या संयोगामुळे काही राशीच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागणार आहे. नेमक्या कोणत्या राशींना या काळात सावध राहावं लागेल? जाणून घेऊया.


कर्क रास (Cancer)


तुमच्या आठव्या भावात सूर्य आणि शनीची युती होत आहे. या काळात कर्क राशीच्या लोकांनी थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. या संयोगामुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कामात अपयशाला सामोरे जावे लागू शकते. कोणत्याही कामात निष्काळजीपणा महागात पडू शकतो. आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. व्यवसायात नफा मिळवण्यासाठी तुम्हाला अधिक कष्ट करावे लागतील. 


सिंह रास (Leo)


तुमच्या राशीच्या सप्तम भावात सूर्य-शनि युती होणार आहे. तुमच्या कुंडलीचे सातवे घर भागीदारीचे आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना सावधगिरीने पुढे जावे लागेल. नोकरदारांना अधिक काळजी घ्यावी लागेल, शत्रूंपासून सावध राहावे लागेल, अन्यथा ते तुमचे नुकसान करू शकतात. विनाकारण कोणाशीही संबंध ठेवू नका, अन्यथा कायदेशीर गुंत्यात अडकू शकता. कोणालाही कर्ज देणे टाळा. 


कुंभ रास (Aquarius)


सूर्य-शनीची युती तुमच्या पहिल्या घरात होणार आहे. या काळात कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनावर काही नकारात्मक प्रभाव पडू शकतो. या राशीच्या लोकांना व्यवसाय आणि नोकरीत नुकसान सहन करावे लागू शकते. काही कामात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल. तुमच्या नोकरीत कामाचा ताण जास्त असू शकतो. अनावश्यक खर्च वाढू शकतो. कुटुंबातील काही मुद्द्यावरून कुटुंबातील इतर सदस्यांशी मतभेद होऊ शकतात. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा : 


Mangal Transit : 15 महिन्यानंतर मंगळ करणार कुंभ राशीत प्रवेश; 'या' राशींना येणार सोन्याचे दिवस, होणार आपार धनलाभ