Numerology Today 29 January 2024 : अंकशास्त्र (Numerology) देखील ज्योतिषशास्त्राप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या भविष्याबद्दल सांगते. अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे मुलांक काढला जातो आणि भविष्याची मांडणी केली जाते. ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्रही महत्त्वाचं आहे, यात गणिताचे नियम वापरुन तुमच्या भविष्याबद्दल सांगितलं जातं.


मुलांक ही जन्मतारीख असते. जर तुमचा जन्म 7 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 7 असेल. परंतु जर तुमचा जन्म 17 किंवा 26 किंवा अशाच दोन सांख्यिक तारखेला झाला असेल, तर तुमचा मुलांक 1+7 = 8, 2+6 = 8 असा काढला जातो. जर एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख 29 असेल, तर 2+9 = 11, 1+1 = 2 असेल, तर व्यक्तीचा मुलांक 2 असेल.


आता तुम्हाला तुमचा मुलांक तर मिळालाच असेल, याद्वारे तुमचा आजचा दिवस कसा जाईल? याबाबत जाणून घेऊया.


मूलांक 1


कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 1 असतो. आज मूलांक 1 असलेल्या लोकांसाठी दिवस अनुकूल असेल. आर्थिक स्थिती पाहता तुम्ही तुमची संपत्ती वाढवण्याचा विचार करू शकता. दैनंदिन व्यायामामुळे तुमच्यावर परिणाम होऊ शकतो, परंतु तरीही व्यायाम करणं सोडू नका. आज व्यवसायात तुम्हाला फायदा होईल, चांगले नवीन करार होऊ शकतात. कौटुंबिक जीवन चांगलं राहील.


मूलांक 2


कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 2 असतो. आज तुमच्यापैकी ज्यांना शहराबाहेर जाऊन मित्र किंवा नातेवाईकांना भेटायचं आहे, ते त्यांची भेट घेऊ शकतात. एखाद्याच्या प्रयत्नाने तुम्ही मालमत्ता खरेदी कराल. आज पैशाची समस्या उद्भवणार नाही आणि  तुमची प्रगती होईल.


मूलांक 3


कोणत्याही महिन्याच्या 3,12, 21, 30 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 3 असतो. मूलांक 3 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. कौटुंबिक आघाडीवर चांगली बातमी मिळाल्याने तुम्ही आनंदी व्हाल. आज तुमचं कुटुंबाबाबतचं प्रेम वाढेल. नोकरीत सहकाऱ्यांची मदत लाभेल.


मूलांक 4


कोणत्याही महिन्याच्या 4,13, 22, 31 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 4 असतो. मूलांक 4 च्या लोकांनी आज पैसे गुंतवण्यात घाई करू नका, अन्यथा नुकसान सहन करावं लागू शकतं. आज तुम्हाला दीर्घ आजारापासून आराम मिळेल. घरात सुख-समृद्धी नांदेल.


मूलांक 5


कोणत्याही महिन्याच्या 5,14, 23 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 5 असतो. मूलांक 5 असलेल्या लोकांच्या आयुष्यात आज अनेक बदल घडणार आहेत. मालमत्तेचे कोणत्याही प्रकरणाचा निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे. 5 मूलांकाचे विद्यार्थी आज अभ्यासात चांगली कामगिरी करतील आणि त्यांचा नावलौकिक वाढवतील. आज तुम्हाला एखादी चांगली व्यक्ती भेटेल, त्या व्यक्तीशी तुम्ही मन भरुन बोलू शकता.


मूलांक 6


कोणत्याही महिन्याच्या 6,15, 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 6 असतो. मूलांक 6 असलेल्या लोकांनी आज स्वत:वर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तणावमुक्त राहण्यासाठी ध्यान करण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्थितीत चढ-उतार असतील. कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. जर तुम्हाला कामाचा खूप ताण वाटत असेल तर काही काळ ब्रेक घ्या.


मूलांक 7


कोणत्याही महिन्याच्या 7,16, 25 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 7 असतो. तुम्ही कोणत्याही मोठ्या प्रकल्पात गुंतवणूक करण्यापूर्वी दोनदा विचार करा. आज किरकोळ आजार वाढू शकतात, त्यामुळे सतर्क राहा. ऑफिसमध्ये प्रलंबित समस्या ओझं ठरू शकते. घरगुती गोष्टी योग्यरित्या हाताळण्याची आवश्यकता पडू शकते.


मूलांक 8


कोणत्याही महिन्याच्या 8,17, 26 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 8 असतो. मूलांक 8 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस व्यस्त असणार आहे. काही लोक आज नातेवाईकांना भेटण्यासाठी शहराबाहेर जाऊ शकतात. मालमत्तेशी संबंधित कोणत्याही गोष्टींना आज हात लावू नका. आज तुमचा दिवस खर्चिक असेल, त्यामुळे अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा.


मूलांक 9


कोणत्याही महिन्याच्या 9,18, 27 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 9 असतो. मूलांक 9 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस खूप भाग्यवान आहे. तुम्ही कुठे बाहेर जाणार असाल तर सुरक्षित प्रवास करा. शैक्षणिक क्षेत्रात आज तुमचा मान-सन्मान मिळेल. आर्थिक व्यवहारात तुम्हाला नफा होण्याची शक्यता आहे. बरेच दिवसांपासून एखाद्या आजारांनी त्रस्त लोकांची स्थिती सुधारेल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा : 


Pisces Weekly Horoscope 29 Jan-04 Feb 2024 : मीन राशीच्या लोकांचा हा आठवडा कसा जाणार? आर्थिक, करिअर, कौटुंबिक स्थिती कशी असणार? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या