Manoj Jarange Raigad Tour : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) लढा जिंकल्यावर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यासह राज्यभरातील मराठा समाज आनंद साजरा करतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान, याच विजयाचा गुलाल उधळण्यासाठी मनोज जरांगे रायगडावर (Raigad) जाणार असून, आजपासून त्यांच्या दौऱ्याला सुरवात होत आहे. याच दौऱ्यात मनोज जरांगे हे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत.
याबाबत बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांच्या संघर्षाला यश मिळाले असून, मराठा समाजाला अखेर न्याय मिळाला आहे. आपण ही लढाई जवळपास जिंकली आहे. आता जोपर्यंत कायदा होत नाही, तोपर्यंत आपल्याला सजग राहावे लागणार आहे. आपल्या लढ्याला यश मिळाल्याने अगोदर जाहीर केल्यानुसार मी 29 जानेवारीला रायगडावर जाणार आहे. तेथे विजयाचा गुलाल उधळणार आहे. आमचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेणार सल्याचे जरांगे म्हणाले आहेत.
मनोज जरांगे यांचा रायगड दौरा (29 जानेवारी)
- अंतरवाली सराटी येथून 7 वाजता दौऱ्याला सुरवात.
- गेवराई-(बीड)
- पाथर्डी-(नगर)
- तिसगाव-(नगर)
- कोडगाव(नगर)
- अहमदनगर
- दौंड(पुणे)
- केडगाव चौफुला(पुणे)
- येळंब
- भोर(पुणे)
- पोलाद नगर(रायगड)
- रायगड
- दिनांक 30 रोजी सकाळी 10 वाजता, रायगडावर दर्शन घेणार.
रस्त्यात ठिकठिकाणी स्वागत होणार....
मराठा समाजाने आरक्षणाची लढाई जिंकली असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. त्यामुळे राज्यभरात जल्लोष केला जात आहे. दरम्यान, आजपासून मनोज जरांगे रायगड जिल्ह्याचा दौरा करत आहेत. त्यांच्या याच दौऱ्याच्या निमित्ताने त्यांचे ठिकठिकाणी स्वागत केले जाणार आहे. मनोज जरांगे यांच्या लढयामुळेच सरकार झुकलं आणि मराठा आरक्षणाच्या बाबत अध्यादेश काढण्यात आल्याची प्रतिक्रिया सर्वत्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे मनोज जरांगे जिथे जातील त्या ठिकाणी त्यांच्या स्वगतासाठी शेकडो कार्यकर्ते हजर असल्याचे पाहायला मिळत आहे.
31 जानेवारीला जरांगे आपल्या घरी जाणार...
मागील पाच महिन्यापासून मनोज जरांगे यांनी आपल्या घरची पायरी ओलांडली नाही. 29 ऑगस्टपासून जरांगे यांनी आंतरवाली सराटी येथे आंदोलन सुरु केले. त्यानंतर जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत घरी जाणार नसल्याचे जरांगे म्हणाले होते. दरम्यान, आता मराठा आरक्षणाच्या बाबत अध्यादेश निघाला असल्याने जरांगे आपल्या घरी जाणार आहे. 31 जानेवारी रोजी मनोज जरांगे आपल्या घरी जाणार असल्याची त्यांनी माहिती दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: