Shani Asta 2025 : तब्बल 30 वर्षांनी कुंभ राशीत शनीचा अस्त; फेब्रुवारी महिन्यात 'या' 3 राशींवर असणार शनीची कृपादृष्टी, मिळणार बक्कळ पैसा
Shani Asta 2025 : शनी तब्बल 30 वर्षांनी कुंभ राशीत अस्त होणार असल्यामुळे सर्व 12 राशींवर याचा परिणाम होणार आहे. मात्र, या दरम्यान 3 राशी अशा आहेत ज्यांचं भाग्य उजळणार आहे.

Shani Asta 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 2025 या नव्या वर्षा न्यायदेवता शनी (Shani Dev) तीनदा आपली चाल बदलणार आहे. त्यानुसार, फेब्रुवारी महिन्यात शनी (Lord Shani) आपली मूळ रास म्हणजेच कुंभ राशीत अस्त होणार आहेत. शनी तब्बल 30 वर्षांनी कुंभ राशीत अस्त होणार असल्यामुळे सर्व 12 राशींवर याचा परिणाम होणार आहे. मात्र, या दरम्यान 3 राशी अशा आहेत ज्यांचं भाग्य उजळणार आहे. या राशींना करिअरबरोबरच व्यवसायातही चांगली प्रगती पाहायला मिळेल. या राशी (Zodiac Signs) कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
शनीचं अस्त मेष राशीच्या लोकांसाठी फार शुभकारक असणार आहे. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, विविध स्त्रोतांमधून तुम्हाला पैसे मिळतील. शेअर मार्केटमध्ये गुंतवलेल्या पैशांतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. मात्र, या कालावधीत तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. मुलांशी संबंधित तुम्हाला एखादी शुभवार्ता ऐकायला मिळू शकते.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ फार चांगला असणार आहे. कारण कर्क राशीच्या लोकांवर सध्या शनीची ढैय्या सुरु आहे. शनीचा अस्त झाल्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच चांगली नोकरी मिळेल. कामात प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. या काळात तुम्ही धार्मिक यात्रेला देखील जाऊ शकता.
मीन रास (Pisces Horoscope)
शनीचं अस्त होणं मीन राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरु शकतं. कारण या राशीच्या लोकांवर शनीची साडेसातीचा प्रभाव आहे. त्यामुळे शनीच्या अस्त होण्याने तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तुमचा मानसिक तणाव दूर होईल. तसेच, या काळात तुमची आवश्यक कामे पूर्ण होतील. तुमची एखाद्या गंभीर आजारापासून सुटका होईल. या काळात तुम्हाला जोडीदाराची देखील चांगली साथ लाभेल. उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासमोर खुले होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:




















