Shami Plant : ज्योतिषशास्त्रात झाडे आणि वनस्पतींना फार महत्त्व देण्यात आलं आहे. यामध्ये काही वनस्पतींची (Plants) विधीवत पूजा देखील केली जाते. ग्रह-नक्षत्रांच्या वाईट प्रभावांना कमी करण्यासाठी झाडे आणि वनस्पतींशी संबंधित उपाय फार प्रभावी मानले जातात. यामध्ये शमी ही एक प्रभावी वनस्पती आहे. 


शमीची वनस्पती शनी देव (Shani Dev) आणि महादेवाला फार प्रिय आहे. यासाठीच त्यांना दैवी वनस्पती देखील म्हटलं आहे. ही वनस्पती लावण्याचे अनेक फायदे आहेत. हे फायदे कोणते ते जाणून घेऊयात. 


शमीचे रोप लावण्याचे फायदे 



  • शनिवारच्या दिवशी घरात शमीचे रोप लावल्याने पैशांची बरकत होते. तसेच, कधीच पैशांची कमतरता राहत नाही असं म्हणतात. हे रोप लावल्याने घरातील वास्तू दोषसुद्धा दूर होतो. तसेच शमीचं रोप लावल्याने विवाहाच्या संबंधित समस्या देखील दूर होतात. 

  • शमीची वनस्पती शनीदेवाची वनस्पती मानली जाते. शनिवारच्या दिवशी ही वनस्पती लावल्याने शनी देवाची तुमच्यावर सदैव कृपा असते. तसेच, या वनस्पतीमुळे कुंडलीतील ग्रह-नक्षत्रांची स्थिती मजबूत होते आणि शनीची साडेसाती दूर होते असं म्हणतात. 

  • शनीबरोबरच भगवान शंकरालाही शमीची वनस्पती फार प्रिय आहे. भगवान शिवाला शमीचं फूल चढविल्याने शनी देव लवकर प्रसन्न होतात. शनिवारच्या दिवशी शनीच्या वनस्पतीवर जल चढवल्याने शनिदेवाची विशेष कृपा होते. 

  • ज्या लोकांवर शनीची साडेसाती आणि ढैय्या सुरु आहे त्या लोकांनी आपल्या घरी शमीचं रोप लावणं गरजेचं आहे. यामुळे शनीचे दुष्प्रभाव कमी होतील. 

  • शनिवारच्या दिवशी घरात शमीचं रोप लावल्याले घरात सुख-समृद्धी टिकून राहते. आणि तुमचे सर्व दु:ख, कष्ट दूर होतात. शमीचे रोप घरात लावल्याने त्या घराची प्रगती होते. 

  • शमीचं रोप हे फार पवित्र मानलं जातं. त्यामुळे हे रोप लावताना स्वच्छ मातीचाच वापर करा. तसेच, हे रोप लावताना घरातील दिशा योग्य ठरवा. या रोपाला तुम्ही घरात लावू शकत नाही. तसेच, या रोपाला तुम्ही टेरेस वर दक्षिण दिशेला तोंड करून ठेवा. जर या ठिकाणी ऊन मिळत नसेल तर पूर्व दिशेला लावा. 

  • तुम्ही घराच्या मुख्य दारापाशी देखील शमीचं रोप लावू शकता. तसेच, रोप लावल्यानंतर संध्याकाळच्या वेळी या रोपाशेजारीच दीवा लावून त्याची पूजा करा. असे केल्याने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होते. या रोपाला तुम्ही कुंडीत कंवा सरळ जमिनीवर लावू शकता. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Varuthini Ekadashi 2024 : आज वरुथिनी एकादशी! जाणून घ्या आजचा शुभ मुहूर्त आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात...