Tanaji sawant on Omraje Nimbalkar : ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी तेरणा साखर कारखान्याचे 1 कोटी रुपयांचे भंगार विकल्याचा धक्कादायक आरोप मंत्री तानाजी सावंत (Tanaji sawant) यांनी केलाय. सुधाकर जवळे पाटील नावाच्या माणसाला ओमराजेंनी भंगार विकल्याचा आरोप सावंतांनी केलाय. महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील (Archana Patil) यांच्या प्रचारार्थ कळंब तालुक्यातील मोहा आयोजीत करण्यात आलेल्या सभेत तानाजी सावंतांनी ओमराजेंवर टीका केलीय.
तेरणा साखर कारखान्यावरुन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पुन्हा एकदा ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. तेरणा कारखान्यातील भंगार चोरीचा सावंतानी पर्दाफाश केला असूमन, ओमराजेंनी 1 कोटी रुपयांचे भंगार विकल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केलाय. ओमराजे निंबाळकर यांनी तेरणा साखर कारखाना बंद पाडल्याचे तानाजी सावंत म्हणाले.
दोन दिवसात भंगार घेतलेला माणूस सगळं सांगेन
मी बोललो की त्याला फार लागतं. माझा बाप मारला, माझा बाप मारला असे ओमराजे निंबाळकर म्हणत आहेत. ठिक आहे तो आता इतिहास झाला. अरे बाबा हा तेरणा 12 वर्षे बंद पाडला तेथील भंगारसुध्दा तू विकलं असे तानाजी सावंत म्हणाले. तू ज्याला भंगार विकलं त्याचं नाव सुधाकर जवळे पाटील आहे. ज्या माणसाला भंगार विकल ते चार दिवसापुर्वीच मला भेटले त्यांनी सांगितले की 1 कोटीच भंगार मी विकत घेतलं आहे. मी 35 लाख रुपये दिले, मी कारखान्यात गेलो, मला मागून जायला सांगितले होते. समोरुन जावु नको म्हणून सांगितले. मात्र, तिथं 35 लाख रुपयांच भंगार होत म्हणून 35 लाख दिले. तर ओमराजेंनी 1 कोटी रुपये दे आणि आणखी जावून काही तोडून घे असं सांगितलं. मी सांगण्यापेक्षा दोन दिवसात तो माणुस इथं आणुन त्याच्याच आवाजात तुम्हाला सांगेल असंही तानाजी सावंत म्हणाले.
ओमराजेंच्या प्रतिउत्तराकडे सर्वांचं लक्ष
आज तेरणा परीवार आणि साखर कारखाना हा जिल्ह्याचा नव्हे तर महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय होता. तो तुम्ही बंद पाडल्याचा आरोप तानाजी सावंतांनी ओमराजेंवर केला. महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ तानाजी सावंत यांची कळंब तालुक्यातील मोहा येथे सभा पार पडली. यावेळी सावंतांनी ओमराजेंवर जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान, तानाजी सावंतांच्या या गंभीर आरोपानंतर आता ओमराजे निंबाळकर काय बोलणार याकडं सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या: