Varuthini Ekadashi 2024 : सनातन हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यात एकादशीते (Ekadashi) व्रत पाळले जाते. वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशीला वरुथिनी एकादशी (Varuthini Ekadashi) व्रत म्हटलं जातं. या दिवशी भगवान विष्णूची (Lord Vishnu) विधीवत पूजा केली जाते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने श्री हरीची कृपादृष्टी राहते. श्री हरीला प्रसन्न करण्यासाठी याला फार शुभ म्हटले गेले आहे. पण, यावर्षीची वरुथिनी एकादशी नेमकी कधी या संदर्भात अनेक जर तुमचा गोंधळ उडत असेल तर या विषयी सविस्तर माहिती जाणूव घ्या.
हिंदू पंचागानुसार, या वेळी एकादशीचं व्रत 4 मे रोजी म्हणजेच (आज) ठेवण्यात येणार आहे. मान्यतेनुसार, या दिवशी धनाच्या संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळविण्यासाठी वरूथिनी एकादशीचं व्रत ठेवलं जातं. जाणून घेऊयात या दिवशीचा शुभ मुहूर्त आणि काय करावं आणि काय करू नये ते जाणून घेऊयात.
वरुथिनी एकादशीचा शुभ मुहूर्त (Varuthini Ekadashi Vrat Shubh Muhurta)
हिंदू पंचांगानुसार, यावर्षी एकादशी तिथीची सुरुवात 3 मे रोजी रात्री 11 वाजून 24 मिनिटांनी होणार आहे. तर, आज (4 मे रोजी) रात्री 8 वाजून 38 मिनिटांनी तिथी संपन्न होणार आहे. उदयतिथीनुसार, यावेळी 4 मे रोजी वरुथिनी एकादशीचं व्रत ठेवण्यात येणार आहे. या दरम्यान वरुथिनी एकादशीच्या निमित्ताने त्रिपुष्कर योग, इंद्र योग, वैधृति योगाचं निर्माण होणार आहे. यामुळे या दिवशी भगवान शंकाराच्या पूजेला विशेष महत्त्व आहे.
वरुथिनी एकादशीच्या दिवशी काय करावं आणि काय करू नये?
- वरूथिनी एकादशीच्या दिवशी तुळशीपूजनलाही विशेष महत्त्व आहे. या दिवशी विधीपूर्वक तुळशीची पूजा केल्याने भगवान विष्णूसह लक्ष्मी देवीचीही विशेष कृपा राहते.
- ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी पशु-पक्ष्यांना पाण्याची व्यवस्था करावी. त्यांना धान्य खायला द्यावे.
- या दिवशी गरजूंना पाणी देणे शुभ मानले जाते.
- एवढेच नाही तर या दिवशी आपल्या क्षमतेनुसार अन्नदान करावे.
- ज्योतिष शास्त्रानुसार वरुथिनी एकादशीच्या दिवशी वस्त्र दान करणे देखील शुभ मानले जाते.
- असे मानले जाते की, वरुथिनी एकादशीला फळं दान केल्यास 10 हजार वर्षांची तपश्चर्या केल्यासारखे शुभ फळ मिळते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: