Scorpio Weekly Horoscope 20 to 26 May : वृश्चिक राशीसाठी नवीन आठवडा सुखद असणार आहे. या काळात काही लोकांना व्यावसायात प्रगतीच्या अनेक सुवर्ण संधी मिळतील. नवीन आठवड्यात तुमची लव्ह लाईफ रोमान्सने भरलेली असेल. प्रियकरासोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल. तुमचं आरोग्यही चांगलं राहील. आर्थिक लाभ होण्याची चिन्हं आहेत. एकूणच वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? वृश्चिक राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
वृश्चिक राशीची लव्ह लाईफ (Scorpio Love Horoscope)
तुमच्या लव्ह लाईफमध्ये या आठवड्यात नवीन रोमांचक वळणं येतील. नात्यातील किरकोळ समस्या सोडवण्यास तुम्ही सक्षम असाल. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. तुमच्या जोडीदाराशी नात्यातील समस्यांवर चर्चा करा. प्रियकरासह दर्जेदार वेळ घालवा. सिंगल लोकांना या आठवड्यात कुणी खास व्यक्ती भेटू शकते.
वृश्चिक राशीचे करिअर (Scorpio Career Horoscope)
ऑफिसमध्ये ओळख वाढेल. नवीन कामांची जबाबदारी मिळेल. काही लोक नोकरी बदलू शकतात. तुमचा जॉब प्रोफाइल अपडेट ठेवा, मुलाखतीसाठी अनेक कॉल्स येऊ शकतात. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये भरघोस यश मिळेल. परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळू शकते. नवीन भागीदारीसह व्यवसायात यश मिळेल.
वृश्चिक राशीची आर्थिक स्थिती (Scorpio Wealth Horoscope)
या आठवड्यात नवीन आर्थिक योजना बनवण्यावर भर द्या. पैशांची आवक वाढेल, पण खर्चावरही नियंत्रण ठेवावं लागेल. महिलांना या आठवड्यात नवीन दागिने खरेदी करता येतील. तुम्हाला तुमच्या भावंडांना किंवा नातेवाईकांना आर्थिक मदत करावी लागेल. जुन्या गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होईल. मालमत्तेशी संबंधित वादातून आराम मिळेल. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. कर्जापासून मुक्ती मिळेल. व्यापाऱ्यांना व्यवसायात मोठं यश मिळेल. मालमत्तेशी संबंधित वादामुळे काही लोकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
वृश्चिक राशीचे आरोग्य (Scorpio Health Horoscope)
तुमचं आरोग्य चांगले राहील, पण दारू पिणं टाळा. रोज योगा आणि व्यायाम करा. काही लोकांना त्वचा, कान किंवा डोळ्यांच्या ऍलर्जीची समस्या असू शकते. दररोज योग आणि ध्यान करा. हे तुम्हाला निरोगी आणि उत्साही ठेवेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: