Libra Weekly Horoscope 20 to 26 May : तूळ राशीसाठी नवीन आठवडा अनुकूल आहे, या आठवड्यात तुम्हाला अनेक चांगल्या बातम्या मिळतील. तुमची प्रोफेशन लाईफ चांगली असेल. कामात तुम्हाला यश मिळेल. लव्ह लाईफमध्ये प्रियकरासोबत वाद होऊ शकतो, त्यांच्याशी बोलून तो सोडवावा. एकूणच तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.


तूळ राशीची लव्ह लाईफ (Libra Love Horoscope)


या आठवड्यात तुम्ही प्रेम जीवनातील सुखद क्षणांचा आनंद घ्याल. तुमच्या जोडीदारासोबत जास्त वेळ घालवा आणि तुमच्या भावना त्यांच्यासोबत शेअर करा. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील तुमच्या जोडीदाराच्या यशाची प्रशंसा करा. भूतकाळातील समस्यांवर जास्त चर्चा करू नका. अविवाहित लोकांनी त्यांच्या क्रशला प्रपोज करण्यात अजिबात संकोच करू नये, तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. जे रिलेशनशिपमध्ये आहेत, त्यांचा जोडीदाराशी क्षुल्लक वाद होण्याची शक्यता आहे, याचा परिणाम नात्यावर जास्त होऊ देऊ नका आणि संवादातून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा.


तूळ राशीचे करिअर (Libra Career  Horoscope)


ऑफिसमध्ये तुमची कामगिरी उत्कृष्ट राहील. परंतु कार्यालयीन राजकारणाचा तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतो. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी नामांकित संस्थांमध्ये प्रवेश घेणं सोपं होणार आहे. महिलांना त्यांच्या करिअरमध्ये पालकांचं सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी विरोधक सक्रिय होतील, त्यामुळे गडबड सुरू राहील. काही लोकांना व्यवसाय वाढवण्याच्या नवीन संधी मिळतील.


तूळ राशीची आर्थिक स्थिती (Libra Wealth Horoscope)


रिअल इस्टेट किंवा स्टॉक मार्केटमध्ये हुशारीने गुंतवणूक करण्यासाठी हा आठवडा योग्य आहे. काही लोकांना मालमत्तेबाबत चालू असलेल्या कायदेशीर वादात यश मिळेल. धर्मादाय कार्यासाठी पैसे खर्च करू शकता. परंतु कोणालाही मोठ्या प्रमाणात कर्ज देणं टाळा, त्यामुळे पैसे परत येण्यासाठी अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. व्यावसायिकांना व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन ठिकाणांहून निधी मिळेल.


तूळ राशीचे आरोग्य  (Libra Health Horoscope)


या आठवड्यात तुमचं आरोग्य चांगलं राहील. पण ज्येष्ठांना निद्रानाशाची समस्या असू शकते. दारू पिणं टाळा. रोज योगा आणि व्यायाम करा. आपल्या आहाराकडे खूप लक्ष द्या. खेळताना मुलांना दुखापत होऊ शकते. प्रवास करताना मेडिकल किट सोबत ठेवा.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Weekly Horoscope 20 To 26 May 2024 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या