Raosaheb Danve : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मोठी घोषणा केली. सगे सोयऱ्यांना आरक्षण देण्याची अंमलबजावणी झाली नाही तर सगळ्या जातीच्या लोकांना एकत्र घेऊन मी विधानसभेची निवडणूक लढणार आहे. राज्यातील 288 जागांवर उमेदवार देणार आहे, असे त्यांनी म्हटले. तसेच लोकसभेच्या निवडणुकीत मराठा एक झाला. मोदींना गोधड्या घेऊन महाराष्ट्रात यावे लागले. चार पाच नेत्यांमुळे मोदींवर ही वेळ आली, असेही त्यांनी म्हटले. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 


केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आज पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, महाराष्ट्रात आम्ही 45 प्लस जागांवर जिंकणार आहोत. जरांगे यांचा लोकसभेला परिणाम नाही. विधानसभेला ते लढणार असे जरांगेंनी सांगितल्याचे रावसाहेब दानवे यांनी म्हटले.  


नड्डा यांच्या वक्तव्याचा विपर्यास


भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी यांनी भाजपला (BJP) एकेकाळी संघाची गरज लागत होती. पण, आता सक्षम असल्यानं आम्ही आमचा पक्ष चालवतो, असे वक्तव्य केले. यावर रावसाहेब दानवे यांना विचारले असता ते म्हणाले की, संघाबाबत नड्डा यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला. त्यांना वाटत असेल संघ आणि भाजपमध्ये वाद होईल पण असे घडणार नाही असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. 


जरांगे यांचा परिणाम कोठेही नाही


ते पुढे म्हणाले की, मनोज जरांगे यांच्यावर एसआयटी नेमली नसून ती घटनेवर होती. जरांगे यांनी मोदींवर केलेली टीका ही भाषण करतानाची होती. जरांगे यांनी कोणाला पाडा सांगितले नव्हते. फडणवीस यांच्यावर टीका केली कारण लाठीहल्ला हा त्यांच्या गृहविभागाने केल्याने तो राग जरांगेंना असेल. मात्र जरांगे यांचा परिणाम कोठेही नाही. महायुती राज्यात 45 पेक्षा जास्त जागा जिंकेल, असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


आता फक्त पाडा म्हणालो, विधानसभेला नाव घ्यावं लागेल; मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचा आक्रमक पवित्रा