Saphala Ekadashi 2025 : सफला एकादशीपासून 'या' राशींचं भाग्य उजळणार; धनसंपत्तीत होणार भरभराट, वर्षाच्या शेवटी बॅंक बॅलेन्स दुप्पट
Saphala Ekadashi 2025 : द्रिक पंचांगानुसार, यंदा सफला एकादशीच्या दिवशी अनेक दुर्लभ संयोग जुळून येणार आहेत. या दिवशी सोमवारच्या दिवशी चित्रा नक्षत्र आणि शोभन योगाचा संयोग जुळून येणार आहे

Saphala Ekadashi 2025 : हिंदू पंचांगानुसार, येत्या 15 डिसेंबर 2025 रोजी म्हणजेच उद्या पौष महिन्यातली सफला एकादशी आहे. सफला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू, देवी लक्ष्मी आणि भगवान श्री कृष्णाची पूजा केली जाते. तसेच, या दिवशी उपवास करणं फार शुभ मानलं जातं. या एकादशीच्या दिवशी आपल्या कार्यात यश मिळण्यासाठी देवाचं स्मरण केलं जातं.
द्रिक पंचांगानुसार, यंदा सफला एकादशीच्या दिवशी अनेक दुर्लभ संयोग जुळून येणार आहेत. या दिवशी सोमवारच्या दिवशी चित्रा नक्षत्र आणि शोभन योगाचा संयोग जुळून येणार आहे. या तीन शुभ संयोगांमुळे या एकादशीचं महत्त्व फार वाढलं आहे. सफला एकादशीच्या दिवशी श्रीहरिसह भगवान शंकराचीसुद्धा पूजा केली जाते. त्यामुळे या दिवशी कोणत्या राशींचा सुवर्णकाळ सुरु होणार आहे ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
सफला एकादशी मेष राशीच्या लोकांसाठी फार लाभदायी ठरणार आहे. भगवान विष्णूच्या कृपेने तुमच्या जीवनात सुख शांती नांदतील. नशिबाची तुम्हाला चांगली साथ मिळेल. तसेच, करिअरमध्ये प्रगतीचे अनेक मार्ग तुमच्यासमोर खुले होतील. कुटुंबियांबरोबर तुमचा चांगला वेळ जाईल.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीसाठी सफला एकादशी फार शुभकारक मानली जाणार आहे. या दिवशी तुम्हाला अनेक नवीन संधी मिळतील. या काळात तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. भगवान शंकराच्या कृपेने तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल. नोकरीत तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.
सिंह रास (Leo Horoscope)
सफला एकादशी सिंह राशीच्या लोकांसाठी फार चांगली असेल. या काळापासून तुम्ही अनेक नवीन शुभकार्याची सुरुवात करु शकता. एखाद्या नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची तुम्हाला संधी मिळेल. तसेच, तुमचा आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
सफला एकादशीपासून कुंभ राशीच्या लोकांचं सर्व कष्ट दूर होतील. शुभ योगांच्या प्रभावामुळे तुमच्या धनसंपत्तीत चांगली भरभराट पाहायला मिळेल. तुमचं वैवाहिक जीवन सुरळीत चालेल.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















