Chaitra Ram Navami 2024 : रामनवमी हा सण चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला साजरा केला जातो. धार्मिक पौराणिक कथेनुसार, चैत्र शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवशी, माता कौशल्येच्या पोटातून भगवान रामाचा जन्म झाला. रामनवमी दरवर्षी चैत्र शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला साजरी केली जाते.
वाल्मिकी रामायणानुसार, भगवान श्रीरामांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला अभिजीत मुहूर्त आणि कर्क राशीत झाला. चैत्र महिन्याच्या नवव्या तिथीला रामनवमी येते. हा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यंदा लाखो भाविक प्रभू रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येला पोहोचणार आहेत. पण याआधी रामनवमीची (Ram Navami 2024 Date) नेमकी तारीख, शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घेऊया…
राम नवमी 2024 कधी आहे? (When Ram Navami 2024?)
हिंदू कॅलेंडरनुसार, चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथी 16 एप्रिल, मंगळवारी, दुपारी 1 वाजून 23 मिनिटांनी सुरू होईल. दुसऱ्या दिवशी, म्हणजेच 17 एप्रिलला दुपारी 3 वाजून 15 मिनिटांनी नवमी तिथी समाप्त होईल. तरी उदय तिथीनुसार, 17 एप्रिल 2024 रोजी रामनवमी साजरी केली जाईल.
राम नवमी 2024 शुभ मुहूर्त (Ram Navami 2024 शुभ मुहूर्त)
हिंदू पंचांगमध्ये शुभ मुहूर्ताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. रामनवमीच्या दिवशी, म्हणजेच 17 एप्रिलला तुम्ही रामाची पूजा सकाळी 11 वाजून 1 मिनिटापासून ते दुपारी 1 वाजून 36 मिनिटांपर्यंत करू शकता. रामललाच्या पूजेसाठी तुमच्याकडे एकूण 2 तास 35 मिनिटांचा वेळ आहे.
विजय मुहूर्त - दुपारी 2 वाजून 34 मिनिटांपासून 3 वाजून 24 मिनिटांपर्यंत
गोधूलि मुहूर्त - सायंकाळी 6 वाजून 47 मिनिटांपासून ते 7 वाजून 9 मिनिटांपर्यंत
राम नवमी शुभ योग (Ram Navami)
हिंदू पंचांगनुसार, रामनवमीच्या दिवशी आश्लेषा नक्षत्राबरोबर रवि योग, सर्वार्थ सिद्धी योग जुळून येत आहे. या दिवशी सकाळी 5 वाजून 16 मिनिटांपासून ते 6 वाजून 8 मिनिटांपर्यंत सर्वार्थ सिद्धि योग असेल. याचबरोबर या दिवशी रवि योग संपूर्ण दिवसभर असेल.
राम नवमीचे महत्त्व (Significance of Ram Navami)
भगवान श्रीरामाची जयंती दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला साजरी केली जाते. हिंदू पौराणिक कथेनुसार, या दिवशी भगवान विष्णूचा सातवा अवतार समजले गेलेले श्री राम यांचा जन्म झाला. या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर (दुपारी 12 वाजता) रामजन्माचा सोहळा होतो. या दिवशी प्रभू श्रीरामाची पूजा करण्याचा सर्वोत्तम काळ सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत मानला जातो. या दिवशी श्रीरामासह माता सीतेची पूजा केल्याने शुभ फल प्राप्त होते आणि व्यक्तीला प्रत्येक दुःखातून मुक्ती मिळते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :