Weekly Lucky Zodiacs 15 To 21 April 2024 : नवीन आठवडा काही राशींसाठी भाग्याचा असणार आहे. 15 एप्रिलपासून काही राशींचं नशीब उजळेल, तुमच्या सुख-समृद्धीत वाढ होईल. आर्थिकदृष्ट्या नवीन आठवडा फलदायी ठरेल. मुख्यत: 5 राशींसाठी नवीन आठवडा लाभदायी असेल, या 5 राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


मेष रास (Aries)


मेष राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा लकी ठरणार आहे. नवीन आठवड्यात तुम्हाला शुभ परिणाम मिळू शकतात. या आठवड्यात तुम्ही तुमच्या गरजेच्या, तुमच्या सोयींच्या वस्तू खरेदी करू शकता. व्यवसायात हा काळ तुमच्यासाठी शुभ ठरेल आणि या काळात तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. या आठवड्यात तुम्ही कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. एक छोटीशी सहल तुमचा मूड फ्रेश करू शकते.


कर्क रास (Cancer)


कर्क राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा फलदायी ठरणार आहे. या आठवड्यात तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते, ज्यामुळे तुमचा आठवडा चांगला जाईल. विद्यार्थ्यांना या आठवड्यात अभ्यासात शुभ परिणाम मिळतील. या आठवड्यात तुम्हाला सौभाग्य लाभेल. या आठवड्यात तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याची योजना कराल, त्यातही तुम्हाला यश मिळेल.


कन्या रास (Virgo)


कन्या राशीच्या लोकांना नवीन आठवड्यात चांगली बातमी मिळू शकते, ज्यामुळे तुमचा मान-सन्मान देखील वाढेल. या आठवड्यात तुम्ही काही चैनीच्या वस्तू खरेदी करू शकता. तुम्हाला तुमच्या करिअरशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. या काळात तुम्हाला व्यवसायात फायदा होऊ शकतो. ऑफिसमध्ये वरिष्ठ आणि कनिष्ठांचं सहकार्य मिळेल.


मकर रास (Capricorn)


येत्या आठवड्यात मकर राशीच्या लोकांनी स्वतःची कामं स्वतः करण्याचा प्रयत्न करावा. या आठवड्यात तुम्ही कुठेतरी फिरायला जाऊ शकता. प्रेमसंबंधात स्वतः पुढाकार घ्या. हा काळ कोणतंही नवीन काम सुरू करण्यासाठी योग्य ठरेल. हा काळ तुमच्यासाठी शुभ आहे. प्रत्येक गोष्टीत तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा पाठिंबा मिळेल.


मीन रास (Pisces)


नवीन आठवडा मीन राशीच्या लोकांसाठी भाग्याचा असेल, या आठवड्यात तुम्हाला एक खास व्यक्ती भेटेल, ज्याच्या मदतीने तुमचं काम पूर्ण होईल आणि तुमचा आदर वाढेल. या आठवड्यात मुलांशी संबंधित काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. एखाद्याला प्रेमाचा प्रस्ताव ठेवायचा असेल तर हा काळ योग्य ठरेल. नवीन आठवड्यात तुमच्या घरात सुख-शांति नांदेल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :


Libra Weekly Horoscope 15th To 21th April 2024 : तूळ राशीच्या व्यक्तींच्या जीवनात घडणार मोठे बदल; आर्थिक निर्णय घेताना सांभाळून, साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या