Rahu Mangal Gochar : दिवाळीला राहू-मंगळसह नवपंचम योगाची निर्मिती; 'या' 3 राशींचं बॅंक बॅलेन्स वाढणार, हातून गेलेला पैसा पुन्हा मिळणार
Rahu Mangal Gochar : ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळ ग्रहाने 20 ऑक्टोबर रोजी कर्क राशीत प्रवेश केला. तर, राहू ग्रह मीन राशीत उपस्थित आहे. यामुळे नवपंचम योग जुळून आला आहे.
Rahu Mangal Gochar : ज्योतिष शास्त्रात राहूला (Rahu) महत्त्वाचा ग्रह मानतात. असं म्हणतात की, कुंडलीत जर राहूची स्थिती चांगली असेल तर गरीबालाही राजा बनवण्याची ताकद त्याच्यात असते. मात्र, राहूची स्थिती वाईट असेल तर राजालासुद्धा गरीबी दाखवण्यास वेळ लागत नाही. यंदा दिवाळीआधी राहू आणि मंगळ ग्रह संक्रमण करुन एकाच राशीत आले आहेत. त्यामुळे सर्व 12 राशींवर याचा परिणाम होणार आहे. या राशींची दिवाळी फार शुभ असणार आहे. या राशी (Zodiac Signs) कोणत्या ते जाणून घेऊयात.
ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळ ग्रहाने 20 ऑक्टोबर रोजी कर्क राशीत प्रवेश केला. तर, राहू ग्रह मीन राशीत उपस्थित आहे. यामुळे नवपंचम योग जुळून आला आहे. हा योग फार शुभ मानला जातो. सर्व 12 राशींवर याचा परिणाम होतो. मात्र, यामुळे 3 राशींचं भाग्य उजळणार आहे.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग फार फायदेशीर ठरणार आहे. या राशी परिवर्तनामुळे तुमच्या आयुष्यात आनंद निर्माण होईल. तसेच, तुम्हाला तुमच्या मेहनतीचं चांगलं फळ मिळेल. तुमच्या करिअरमध्ये तुमची चांगली प्रगती होईल. तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. तसेच, तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील.
कन्या रास (Virgo Horoscope)
राहू ग्रह चांगल्या स्थितीत सक्रीय असल्यामुळे या राशीच्या वैवाहिक जीवनात चांगला आनंद राहील. समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. तसेच, तुम्हाला जर नवीन कार्य सुरु करायचं असेल तर त्यासाठी हा काळ चांगला आहे. तुमच्या धनसंपत्तीत चांगली वाढ होईल. कन्या राशीच्या लोकांना कुटुंबियांचा चांगला पाठिंबा मिळेल. तसेच, तुमचं आरोग्य देखील एकदम ठणठणीत असणार आहे.
वृषभ रास (Taurus Horoscope)
राहू-मंगळच्या संयोगाने तुमच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडून येतील. तुमच्या व्यवसायात चांगली वाढ झालेली पाहायला मिळेल. तसेच, गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला आहे. तुम्हाला नोकरीचे अनेक प्रस्ताव येतील. कुटुंबियांबरोबर तीर्थयात्रेला तुम्ही जाण्याचा प्लॅन करु शकता. तसेच, मित्रांच्या सहयोगाने तुमची अनेक कामे पूर्ण होतील. तुम्ही हाती घेतलेल्या कामात तुम्हाला चांगलं यश येईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: