Rahu Ketu Remedies : ज्योतिषशास्त्रात राहू-केतूला छाया ग्रह म्हणतात. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू किंवा केतूचा दोष असतो. त्याला जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्याचे जीवन अनेक प्रकारच्या संकटांनी वेढलेले आहे. आयुष्यात एका समस्येतून सुटका होत नाही की, दुसरी समस्या येते. त्यामुळे राहू-केतूच्या दोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी लवकरात लवकर उपाय करावेत. हे उपाय केल्याने राहू दोष आणि केतू दोषाचा प्रभाव कमी करता येतो.
राहू केतू कोण आहे?
राहू केतू कोण आहे? हे जाणून घेणेही महत्त्वाचे आहे. एका पौराणिक कथेनुसार राहु केतू हे एकाच राक्षसाचे दोन भाग आहेत. स्वरभानू नावाचा एक राक्षस होता, जो समुद्रमंथनाच्या वेळी कपटाने अमृताचे काही थेंब पिण्यात यशस्वी ठरला होता, परंतु शेवटच्या क्षणी चंद्र आणि सूर्याने भगवान विष्णूंना याची माहिती दिली, त्यानंतर लगेचच विष्णूजींनी सुदर्शन चक्राने त्याची मान धडापासून वेगळी केली. पण तोपर्यंत अमृताचे काही थेंब त्यांच्या शरीरात गेले, त्यामुळे मृत्यू होऊनही तो जिवंत राहिला. याच कारणामुळे डोक्याच्या भागाला राहू आणि उर्वरित शरीराच्या धडाच्या भागाला केतू म्हणतात.
कलियुगातील अतिशय प्रभावी ग्रह
ज्योतिष शास्त्रामध्ये राहु केतूला जीवनातील भ्रम आणि अचानक घडणाऱ्या घटनांचे कारण मानले जाते. कुंडलीतील त्यांच्या शुभ आणि अशुभ स्थितीनुसार ते परिणाम देतात. हे ग्रह अशुभ ग्रह मानले जातात. हे कलियुगातील अतिशय प्रभावी ग्रह आहेत.
राहू केतूचा वाईट प्रभाव टाळण्यासाठी उपाय
-राहू आणि केतू यांना छाया ग्रह म्हणतात. त्यांचे वाईट परिणाम कमी करण्यासाठी देवी दुर्गेची पूजा विधी केले जातात. असे मानले जाते की, ज्यांच्यावर देवी दुर्गेचा आशीर्वाद असतो. राहू आणि केतूचा त्याच्यावर वाईट प्रभाव पडत नाही.
-राहू आणि केतूच्या वाईट प्रभावापासून मुक्त होण्यासाठी दररोज नागावर नृत्य करणाऱ्या श्रीकृष्णाची पूजा करावी. रोजच्या पूजेदरम्यान ओम नमः भगवते वासुदेवाय मंत्राचा 108 वेळा जप करा.
-ज्यांना राहू आणि केतूच्या दोषाने त्रास होत असेल, त्यांनी राहु-केतू ग्रहाशी संबंधित वस्तूंचे दान करावे आणि नियमानुसार रोज त्यांच्या बीज मंत्रांचा जप करावा. असे केल्याने त्यांचा प्रभाव कमी होतो असे मानले जाते.
-राहु-केतू ग्रस्त लोकांनी गरीब मुलीच्या लग्नात यथाशक्ती दान करा. शास्त्रात कपिला गाईचे दान करणे उत्तम मानले गेले आहे. असे मानले जाते की, यामुळे राहू केतूचा वाईट प्रभाव कमी होऊ शकतो.
-ज्यांच्या कुंडलीत राहू दोष आहे, त्यांनी हलके निळे कपडे घालावेत.
-ज्यांच्या कुंडलीत केतू दोष आहे, त्यांनी फिकट गुलाबी रंगाचे कपडे घालून दान करावे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्वाच्या बातम्या :
- Numerology : 'या' तारखांना जन्मलेले लोक स्वभावाने श्रीमंत आणि अहंकारी असतात
- Samudra Shastra : ओठ सांगतात एखाद्या व्यक्तीचे नशीब आणि स्वभाव, कसे ते जाणून घ्या