एक्स्प्लोर

Pitru Paksha 2024 : अकाली मृत्यू, मृत अविवाहित व्यक्ती, सुवासिनी...कोणाचं श्राद्ध कोणत्या तिथीला करावं? वाचा महत्त्वाचे नियम

Pitru Paksha 2024 : हिंदू धर्मानुसार असे मानले जाते की, जर पितरांसाठी श्राद्ध केले तर पितर आपल्या वंशजांना आशीर्वाद देतात, ज्यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते.

Pitru Paksha 2024 : आजपासून पितृ पक्षाला सुरुवात झाली आहे. हिंदू धर्मात पितृ पक्षाला (Pitru Paksha) खूप महत्त्व आहे. अशी मान्यता आहे की, या दिवसांत आपल्या प्रियजनांना भेटण्यासाठी पूर्वज यमलोकातून पृथ्वीतलावर येतात. त्यामुळे त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पितृपक्षात तर्पण आणि श्राद्ध केले जाते. हिंदू धर्मानुसार असे मानले जाते की, जर पितरांसाठी श्राद्ध केले तर पितर आपल्या वंशजांना आशीर्वाद देतात, ज्यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते.

मात्र, श्राद्धाची तिथी कशा प्रकारे करावी? तसेच, कोणत्या दिवशी कोणाचं श्राद्ध करावं? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 

कोणी करावं श्राद्ध कर्म?

पितृ पक्षात आपल्या पितरांच्या संतुष्टीसाठी श्राद्ध करणं गरजेचं आहे. अन्यथा जे लोक आपल्या पितरांच्या संपत्तीचा वापर करतात पण त्यांचं श्राद्ध करत नाहीत त्यांना पितृ दोष लागतो. आणि जीवनात अनेक संकटांचा सामना करावा लागतो. 

आता प्रश्न असा पडतो की श्राद्ध नेमकं कोणी करावं? तर, ज्या घरातील व्यक्ती मृत झालेली आहे. त्या घरातील सर्वात मोठ्या पुत्राने श्राद्ध कर्म करावे. श्राद्ध कर्म करताना पूर्व 3 पिढ्यांचे करावे. यामध्ये वडील, भाऊ, आजोबा, आजी, भाऊ, काका, मामा, बहीण, गुरु, शिष्य इ. यांचा देखील समावेश होतो. 

श्राद्धाची तिथी कशी ठरवावी?

  • ज्या दिवशी आपल्या प्रियजनांचा मृत्यू झाला त्या तिथीपासून श्राद्धाची तिथी करावी. म्हणजेच ज्या दिवशी व्यक्तीने शेवटचा श्वास घेतला आणि त्यावेळेला पंचांगानुसार जी तिथी असेल पितृ पक्षात त्याच तिथीला श्राद्ध करावे. जर ती तिथी लक्षात नसेल तर पितृ अमावस्येच्या दिवशी श्राद्ध करावे. 
  • ज्या लोकांचा मृत्यू नैसर्गिक झाला असेल आणि त्या दिवशी चतुर्दशी तिथी असेल तर त्याचं श्राद्ध पितृपक्षाच्या त्रयोदशी तिथी किंवा अमावस्येच्या दिवशी करावे. ज्यांचा मृत्यू नैसर्गिक झाला आहे त्यांनी चतुर्दशीच्या दिवशी श्राद्ध करु नये. 
  • एखादी दुर्घटना, साप चावला असल्यास, आत्महत्या किंवा हत्या किंवा अकाली मृत्यू झाला असल्यास त्या व्यक्तीचं श्राद्ध चतुर्दशी तिथीलाच करावे.अशा व्यक्तीचं श्राद्ध त्यांच्या मृत्यूच्या तिथीला कधीच करु नये. 
  • सुवासिनी महिलांचं श्राद्ध पितृ पक्षाच्या नवमी तिथीला करावं. 
  • ब्रह्मचारी किंवा संज्ञासी लोकांचं श्राद्ध पितृपक्षाच्या द्वादशी तिथीला करावं. 
  • आजी-आजोबांचं श्राद्ध अश्विन शुक्ल प्रतिपदेला करावं.  

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Chandra Grahan 2024 : आज लागलं वर्षातलं शेवटचं चंद्र ग्रहण; दुष्परिणामांपासून वाचण्यासाठी ग्रहणानंतर करा 'हे' उपाय

महत्त्वाच्या बातम्या

Vastu Shashtra: देवघरात तुम्हीही लाल वस्त्र ठेवता? तर 'या' गोष्टींची काळजी घ्या! वास्तुशास्त्राचे 'हे' नियम, धार्मिक महत्त्व, परंपरा माहितीय?
देवघरात तुम्हीही लाल वस्त्र ठेवता? तर 'या' गोष्टींची काळजी घ्या! वास्तुशास्त्राचे 'हे' नियम, धार्मिक महत्त्व, परंपरा माहितीय?
Dusshera 2026: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशींच्या भाग्योदयाची सुरूवात! दसऱ्याचा सण ठरणार गेमचेंजर, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशींच्या भाग्योदयाची सुरूवात! दसऱ्याचा सण ठरणार गेमचेंजर, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
Horoscope Today : आज मंगळवारचा दिवस 5 राशींचं नशीब पालटणारा! गणरायाच्या कृपेने आर्थिक चणचण संपणार, अचानक धनलाभ; 12 राशींचे आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस 5 राशींचं नशीब पालटणारा! गणरायाच्या कृपेने आर्थिक चणचण संपणार, अचानक धनलाभ; 12 राशींचे आजचे राशीभविष्य
Dusshera 2026: आज दसरा..देवघरातील नवरात्रीचा घट कधी हलवावा? घट हलविण्यापूर्वी 'या' विधी माहितीय? शुभ मुहूर्त, पूजा, परंपरा..
आज दसरा..देवघरातील नवरात्रीचा घट कधी हलवावा? घट हलविण्यापूर्वी 'या' विधी माहितीय? शुभ मुहूर्त, पूजा, परंपरा..

व्हिडीओ

Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Farmers Death Maharashtra: कर्जमाफीच्या यादीत नाव आलं नाही, नांदेडच्या शेतकऱ्याने रडतरडत प्राण सोडले, काळीज हेलावून टाकणारा व्हिडीओ
कर्जमाफीच्या यादीत नाव आलं नाही, नांदेडच्या शेतकऱ्याने रडतरडत प्राण सोडले, काळीज हेलावून टाकणारा व्हिडीओ
Satej Patil : गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला फटका, सतेज पाटलांच्या विजयाची इनसाईड स्टोरी, सहा प्रमुख मुद्दे
गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला फटका, सतेज पाटलांच्या विजयाची इनसाईड स्टोरी, सहा प्रमुख मुद्दे
Salman Khan Bigg Boss 20 Weekend Ka Vaar: सलमान खाननं टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर उचललं महत्त्वाचं पाऊल? 'बिग बॉस 20'बाबत घेतला मोठा निर्णय, म्हणाला...
सलमान खाननं टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर उचललं महत्त्वाचं पाऊल? 'बिग बॉस 20'बाबत घेतला मोठा निर्णय, म्हणाला...
Nashik: अर्धनग्न पूजा ते दैवी अन् अघोरी शक्तीने पैशांचा पाऊस पाडण्याचा बहाणा, नाशिकच्या भोंदूने पनवेलच्या पीडितेसोबत नको-नको ते केलं; अंनिसच्या प्रयत्नांनंतर अखेर गुन्हा दाखल
अर्धनग्न पूजा ते दैवी अन् अघोरी शक्तीने पैशांचा पाऊस पाडण्याचा बहाणा, नाशिकच्या भोंदूने पनवेलच्या पीडितेसोबत नको-नको ते केलं; अंनिसच्या प्रयत्नांनंतर अखेर गुन्हा दाखल
Elon Musk : इलॉन मस्क यांची मोठी घोषणा, अमेरिकेतील प्रत्येक मुलाला SpaceX चा एक शेअर देणार, मस्क यांच्या घोषणेचं नेमकं कारण काय?
इलॉन मस्क यांची मोठी घोषणा, अमेरिकेतील प्रत्येक मुलाला SpaceX चा एक शेअर देणार 
Gokul Election Result: कोल्हापूरकरांचा विषयच हार्ड! जयंत पाटील यांची गोकुळच्या निकालावर पोस्ट, सतेज पाटील यांचं अभिनंदन
कोल्हापूरकरांचा विषयच हार्ड! जयंत पाटील यांची गोकुळच्या निकालावर पोस्ट, सतेज पाटील यांचं अभिनंदन
आमचा रांगडा पाटील जिंकला, धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले; आता, शिक्षक-पदवीधरचं सोनंही आम्हीच लुटणार
आमचा रांगडा पाटील जिंकला, धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले; आता, शिक्षक-पदवीधरचं सोनंही आम्हीच लुटणार
'गोकुळ'मध्ये महायुतीचा पराभव, मुलगाही पडला; मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया, सांगितलं परभवाचं राज'कारण'
'गोकुळ'मध्ये महायुतीचा पराभव, मुलगाही पडला; मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया, सांगितलं परभवाचं राज'कारण'
Embed widget