एक्स्प्लोर

Pithori Amavasya 2023 : यंदाची पिठोरी अमावस्या ठरेल फलदायी! अपत्यप्राप्ती, पितरांचा आशीर्वाद मिळेल, जाणून घ्या महत्त्व

Pithori Amavasya 2023 : पिठोरी अमावस्येला स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी उपवास करतात. संततीची इच्छा असणारे देखील या दिवशी व्रत-पूजा करतात. जाणून घ्या

Pithori Amavasya 2023 : पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील पंधराव्या तिथीला अमावस्या म्हणतात. याला श्रावण अमावस्या, पोळा अमावस्या तसेच दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते. तसेच या दिवशी बैलपोळा सण देखील साजरा केला जातो. पिठोरी अमावस्येला स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी उपवास करतात. संततीची इच्छा असणारे देखील या दिवशी व्रत-पूजा करतात. पितरांना तर्पणसोबतच ही तिथी धनदेवतेच्या पूजेसाठीही अत्यंत फलदायी मानली जाते. पिठोरी अमावस्या, भाद्रपद महिन्यातील अमावस्याचे धार्मिक महत्त्व आणि उपाय याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.


मुलांच्या सुखासाठी, संततीसुखासाठी पूजा
भाद्रपद महिन्यात येणारी अमावस्या पिठोरी अमावस्या म्हणून ओळखली जाते. हिंदू मान्यतेनुसार, भाद्रपद महिन्यातील या अमावास्येला मुलांच्या सुखासाठी आणि सौभाग्यासाठी पितरांची पूजा केली जाते, तसेच दुर्गा देवीची पूजा करण्याची परंपरा आहे. 


भाद्रपद अमावस्या कधी असते?
पंचांगानुसार या वर्षी भाद्रपद महिन्यातील अमावस्या 14 सप्टेंबर 2023 रोजी येणार आहे. पंचांगानुसार, भाद्रपद महिन्याची अमावस्या 14 सप्टेंबर 2023 रोजी पहाटे 04:48 पासून सुरू होईल आणि 15 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 07:09 पर्यंत संपेल


पिठोरी अमावस्या का म्हणतात?

भाद्रपद महिन्यातील अमावस्येच्या दिवशी पिठाची आकृती बनवून दुर्गादेवीसह 64 देवींची पूजा करण्याची परंपरा आहे. पिठोरीमध्ये पिठ या शब्दाचा अर्थ पीठ असा होतो, त्यामुळे याला पिठोरी अमावस्या असे संबोधण्यात आले. या दिवशी पूजा, जप आणि तपश्चर्या सोबतच स्नान आणि दान करणे खूप महत्वाचे मानले जाते.

 

पिठोरी अमावस्येसाठी 5 उत्तम उपाय
-हिंदू मान्यतेनुसार पिठोरी अमावस्या तिथी पितरांशी संबंधित दोष दूर करण्यासाठी अत्यंत फलदायी मानली जाते. 
-अशा स्थितीत या तिथीला पितरांसाठी श्राद्ध व तर्पण आणि अन्नदान इत्यादी पूर्ण विधीपूर्वक करावेत. 
-असे केल्याने कुंडलीतील पितृदोष दूर होतो आणि त्याच्या कृपेने सुख आणि सौभाग्य प्राप्त होते असे मानले जाते.
-जर तुमच्या कुंडलीत कालसर्प दोष असेल तर त्याच्याशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी पिठोरी अमावस्येला चांदीच्या नागाची जोडी बनवून त्यांची पूजा करावी. 
-यानंतर ते पवित्र नदी किंवा समुद्राच्या पाण्यात विसर्जित केले पाहिजे.
-जर तुम्हाला तुमच्या जीवनात सर्व प्रकारच्या समस्या येत असतील तर पिठोरी अमावस्येच्या दिवशी पिठाच्या गोळ्या माशांना खायला द्याव्यात. 
-ज्योतिषशास्त्रानुसार हा उपाय केल्याने जीवनाशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात.
-ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या कुंडलीत शनि संबंधित दोष असल्यास ते दूर करण्यासाठी अमावस्येच्या दिवशी काळे कपडे, काळे चादरी, काळे बूट, काळी छत्री इत्यादी दान करावे. 
-त्याचप्रमाणे अमावस्येला काळ्या मुंग्यांना मैदा आणि साखर मिसळून खाऊ घातल्यास शनीची बाधा दूर होते.
-जाणूनबुजून किंवा नकळत शत्रूंपासून धोका असेल तर पिठोरी अमावस्येच्या दिवशी काळ्या कुत्र्यांना तेलात भिजवलेली भाकरी खायला द्यावी.

अमावस्या तिथी सुरूवात - 14 सप्टेंबर 2023 सकाळी 04.48 वाजता
अमावस्या तिथी समाप्त - 15 सप्टेंबर 2023 सकाळी 07:09 वाजता

अशी करा पूजा
हे व्रत सुवासिनी स्त्रिया करतात. 
या दिवशी उपवास करुन सायंकाळी स्नान करतात. 
चौसष्ट योगिनींच्या चित्राच्या कागदाची पूजा करतात. 
या दिवशी खीर-पुरी, पुरणपोळी, साटोरी, असे पदार्थ तयार करतात 
व्रत पूर्ण केले महणजे अखंड सौभाग्य व दीर्घायु अपत्य होतात. 
पिठोरी अमावास्येला वंशवृद्धीसाठी ही पूजा करण्यात येते. 
 या दिवशी सायंकाळी आठ कलश स्थापित केले जातात. 
त्यावर पूर्णपात्रे ठेवून ब्राह्मी, माहेश्वरी व इतर शक्तींची पूजा केली जाते. 
तांदुळाच्या राशीवर चौसष्ट योगिनींना आवाहन देऊन पिठाच्या मूर्ती तयार केल्या जातात. 
तसेच पिठाने तयार केलेल्या पदार्थांचाच नैवेद्य दाखवण्यात येतं.

 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

 

इतर बातम्या

Ganeshotsav 2023: 'ही' आहेत भारतातील प्रसिद्ध गणपती मंदिर; यंदा गणेश चतुर्थीनिमित्त देऊ शकता भेट

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today : आजचा रविवार 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच मनातील इच्छा होणार पूर्ण, वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच मनातील इच्छा होणार पूर्ण, वाचा आजचे राशीभविष्य
Dhanteras 2026 : 6 की 7 नोव्हेंबर? धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त नेमका कधी? जाणून घ्या योग्य तारीख आणि वस्तू खरेदीचा शुभ मुहूर्त 
6 की 7 नोव्हेंबर? धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त नेमका कधी? जाणून घ्या योग्य तारीख आणि वस्तू खरेदीचा शुभ मुहूर्त 
Weekly Horoscope : तूळ आणि वृश्चिक राशीसाठी ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा ठरणार भाग्यशाली! देवी लक्ष्मीची असणार विशेष कृपा; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
तूळ आणि वृश्चिक राशीसाठी ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा ठरणार भाग्यशाली! देवी लक्ष्मीची असणार विशेष कृपा; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Chanakya Niti : पक्ष्यांसारखी उंच भरारी घ्या; बगळा, कावळा, कोंबड्याकडून शिका 'या' महत्त्वाच्या गोष्टी, चाणक्य सांगतात...
पक्ष्यांसारखी उंच भरारी घ्या; बगळा, कावळा, कोंबड्याकडून शिका 'या' महत्त्वाच्या गोष्टी, चाणक्य सांगतात...

व्हिडीओ

Cordelia Cruise Arrives in Mumbai : पंचतारांकीत जहाज, सफर खास! | Special Report ABP Majha
KBC Farmers Kailas Kuntewad : केबीसीत जिंकले... पण दुष्काळासमोर हरले | Special Report ABP Majha
Sanjay Raut Mumbai : या नाटकात फडणवीस, शिंदे अन् जरांगे मुख्य पात्रे; बाकी सगळे एक्स्ट्रा- संजय राऊत
Manoj Jarange PC : मला का संपवायचंय? आता त्यांना सोडत नाही : मनोज जरांगे
Manoj Jarange Call Recording : चर्चेत फोन, पहचान कौन? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गोळीबाराच्या घटनेनं नाशिक हादरलं, एकतर्फी प्रेम प्रकरणातून झाडली गोळी; पोलिसांकडून दोघांना बेड्या, गावठी कट्टाही जप्त
गोळीबाराच्या घटनेनं नाशिक हादरलं, एकतर्फी प्रेम प्रकरणातून झाडली गोळी; पोलिसांकडून दोघांना बेड्या, गावठी कट्टाही जप्त
Anant Singh : चालता-बोलता शिव्या-धमक्या देणारे बाहुबली आमदार अनंत सिंहांची पक्षातून हकालपट्टी, आमदारकी रद्द करण्यासाठी पत्र, बिहारमध्ये राजकीय भूकंप
चालता-बोलता शिव्या-धमक्या देणारे बाहुबली आमदार अनंत सिंहांची पक्षातून हकालपट्टी, आमदारकी रद्द करण्यासाठी पत्र, बिहारमध्ये राजकीय भूकंप
मंत्री दादा भुसेंसह अधिकाऱ्यांनी अंतरपाट धरला; नरहरी झिरवाळांनी गायली मंगलाष्टिका, नाशिकमधील लग्नसोहळ्याची चर्चा
मंत्री दादा भुसेंसह अधिकाऱ्यांनी अंतरपाट धरला; नरहरी झिरवाळांनी गायली मंगलाष्टिका, नाशिकमधील लग्नसोहळ्याची चर्चा
Bengal Bay Cyclone : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे सावट, 'या' राज्यांना IMD कडून अलर्ट; कुठे-कुठे हाहाकार माजणार?
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे सावट, 'या' राज्यांना IMD कडून अलर्ट; कुठे-कुठे हाहाकार माजणार?
आता पोलिसांना नाही, मुख्यमंत्र्यांनाच पुरावे देणार; राम पूर्णेकरांचे धक्कादायक आरोप, मिनाक्षी शिंदेंच्या अटकेची मागणी
आता पोलिसांना नाही, मुख्यमंत्र्यांनाच पुरावे देणार; राम पूर्णेकरांचे धक्कादायक आरोप, मिनाक्षी शिंदेंच्या अटकेची मागणी
श्रीकांत शिंदे म्हणाले, 500 कोटी हातातून, बॅगेतून नेता येत नाही; प्रसाद लाड यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
श्रीकांत शिंदे म्हणाले, 500 कोटी हातातून, बॅगेतून नेता येत नाही; प्रसाद लाड यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
KBC Drought Story: केबीसीत लाखो जिंकला, पण दुष्काळात हरला; मराठवाड्यातील शेतकऱ्याची व्यथा, विहीर कोरडी,डोळ्यात पाणी
KBC Drought Story: केबीसीत लाखो जिंकला, पण दुष्काळात हरला; मराठवाड्यातील शेतकऱ्याची व्यथा, विहीर कोरडी,डोळ्यात पाणी
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक, ऊस दराबाबत तोडगा नाहीच; स्वाभिमानीचं आंदोलन सुरूच राहणार
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक, ऊस दराबाबत तोडगा नाहीच; स्वाभिमानीचं आंदोलन सुरूच राहणार
Embed widget