Pisces Weekly Horoscope 10th To 16th March 2024 : मीन राशीच्या लोकांचा हा आठवडा थोडा खडतर असेल. या आठवड्यात तुम्ही कार्यालयीन राजकारणापासून दूर राहा. तुमच्या क्षमतेची चाचणी घेतली जाऊ शकते. व्यावसायिकांनी या आठवड्यात खबरदारी घ्यावी, गुंतवणुकीतून तोटा संभवतो. तुमच्या लव्ह लाईफमध्ये अनेक अडचणी येतील, वाद वाढतील. आरोग्याचीही काळजी घ्यावी लागेल. मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? मीन राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.


मीन राशीची लव्ह लाईफ (Pisces Love Horoscope)


नवीन आठवड्यात तुम्हाला लव्ह लाईफ नकोशी वाटेल, तुमची डोकेदुखी वाढेल. तुम्ही जोडीदारासोबतचे वाद लवकरात लवकर सोडवले पाहिजे. काहीजणांना त्यांच्या जोडीदाराला खुश ठेवावं लागेल, तु्म्हाला त्यांचे लाड करावे लागतील. तुमच्या जोडीदाराच्या भावनांची कदर करा. जे विवाहित आहेत त्यांनी आधीच्या प्रियकराशी संबंध ठेवू नये, अन्यथा समस्या वाढू शकतात. विवाहितांनी ऑफिसमध्ये लफडी करणं टाळावं, अन्यथा अडचणीत सापडू शकता.


मीन राशीचे करिअर  (Pisces Career Horoscope)


नोकरदारांनी या आठवड्यात कार्यालयीन राजकारणापासून दूर राहावं. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याचे तुमचे प्रयत्न तुम्हाला बॉसच्या गूड बुक्समध्ये ठेवतील. कलाकार, लेखक, संगीतकार आणि डिझायनर यांना त्यांचे कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळेल. व्यावसायिक एखाद्या नवीन योजनेत गुंतवणूक करू शकतात, तुम्हाला या काळात पैशाची कमतरता भासणार नाही. व्यवसायात ग्राहक तुमच्या क्षमतेची चाचणी घेतील, त्यांच्याशी चांगल्या शब्दात आणि जपून डील करा.


मीन राशीची आर्थिक स्थिती (Pisces Wealth Horoscope)


या आठवड्यात तुम्हाला किरकोळ आर्थिक समस्या जाणवतील आणि त्याचा तुमच्या जीवनशैलीवरही परिणाम होऊ शकतो. पैशांशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेताना काळजी घ्या. शेअर्स, ट्रेडिंग किंवा एखाद्या व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी आठवड्याचे पहिले दिवस अजिबात चांगले नाही. भूतकाळातील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळत नसला तरी व्यवसायाला पुढील स्तरावर नेण्यासाठी व्यापाऱ्यांना चांगल्या संधी दिसतील.


मीन राशीचे आरोग्य  (Pisces Health Horoscope)


या आठवड्यात तुम्हाला आरोग्याशी संबंधित कोणतीही मोठी समस्या उद्भवणार नाही. ज्येष्ठ नागरिकांनी जिने चढताना किंवा बस किंवा ट्रेनमध्ये चढताना काळजी घ्यावी. काही महिलांना स्त्रीरोगविषयक समस्यांचा सामना करावा लागू शकतो, ज्यासाठी वैद्यकीय सल्ला आवश्यक असेल. तुम्ही योग आणि ध्यानासाठी वेळ काढावा. सकाळी योगासनं आणि थोडा हलका व्यायाम करणं खूप फायदेशीर ठरेल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Aquarius Weekly Horoscope 10 To 16 March 2024 : कुंभ राशीसाठी पुढचे 3 दिवस कठीण काळाचे; या आठवड्यात गुंतवणुकीदरम्यान सावधान, साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या