Diljit Dosanjh : देशातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा छोटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चेंट (Radhika Merchant) यांचा प्री-वेडिंग कार्यक्रम नुकताच पार पडला. या सोहळ्याला जगभरातील अनेक सेलिब्रिटींनी खास परफॉर्मन्स केला. दरम्यान बॉलिवूड सेलिब्रिटींनीदेखील आपल्या सादरीकरणाने कार्यक्रमाची शोभा वाढवली. बॉलिवूडचा लोकप्रिय गायक दिलजीत दोसांझने (Diljit Dosanjh) प्री-वेडिंगमध्ये 20 मिनिटं एक्स्ट्रा गाणं गाण्याचे चांगलेच पैसे घेतले आहेत.


दिलजीत दोसांझ हा बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक, गीतकार, अभिनेता, सिने-निर्माता आहे. त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. सर्वसामान्यांसह मोठ-मोठ्या कलाकारांनाही त्याची गाणी आवडतात. अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग कार्यक्रमाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यातील दिलजीत दोसांझच्या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमध्ये करीना कपूर (Kareena Kapoor), करिश्मा कपूर (Karishma Kapoor) आणि बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) थिरकताना दिसत आहेत.


1 ते 3 मार्च दरम्यान जामनगरमध्ये अनंत-राधिका यांचा प्री-वेडिंग कार्यक्रम पार पडला. 2 मार्च 2024 रोजी अंबानींनी आयोजीत केलेल्या कार्यक्रमात सलमान खान (Salman Khan), शाहरुख खान (Shah Rukh Khan) आमिर खानसह (Aamir Khan) अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. दिलजीत दोसांझच्या आपल्या गाण्यांनी सर्वांनाच वेड लावलं. शेवटी आणखी 20 मिनिटे गाणी सुरू ठेवण्यासाठी अंबानींना दिलजीतकडे रिक्वेस्ट करावी लागली.


करिश्मा कपूरसह दिलजीतच्या नृत्याने वेधलं लक्ष


करिश्मा कपूरसह दिलजीतच्या नृत्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दिलजीतने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केले आहेत. यात तो करिश्मा कपूरसोबत धमाकेदार डान्स करताना दिसून येत आहे. करिश्मासह करिनानेदेखील दिलजीतच्या गाण्यांवर डान्स केला आहे. दिलजीतच्या गाण्यांवर शाहरुख खान, सुहाना खान, अनन्या पांडे, नव्या नवेदी नंदा आणि शनाया कपूर डान्स करताना दिसून आले आहेत.






दिलजीतने किती मानधन घेतलं? 


अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये गाणं गाण्यासाठी दिलजीतने चार कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे. तर 20 मिनिटे एक्स्ट्रा गाणं गाण्याचे त्याने काहीही पैसे घेतलेले नाहीत. दिलजीत हा आजच्या घडीला सर्वात महागडा गायक आहे. त्याची एकूण संपत्ती 166 कोटींच्या आसपास आहे.


संबंधित बातम्या


Anant Ambani-Radhika Merchant Pre-Wedding : अनंत-राधिकाच्या प्री वेडिंगमध्ये खिलाडी कुमारचा धमाकेदार फरफॉर्मन्स, पण त्यासाठी अक्षयला मोडावा लागला त्याचा फार जुना नियम